काल आॅफिसमधून बाहेर निघालो होतो. भास्कर नावाचा मित्र सोबत होताच. आम्ही दोघे जवळ असलेल्या बाजारातून चालत होतो. अचानक माझी नजर एका दुकानाकडे गेली आणि माझे पाय नकळत त्या दिशेने वळले. प्लॅस्टर आॅफ पॅरिसपासून बनविलेले किल्ले तेथे विकण्यासाठी ठेवण्यात आले होते. दिवाळी काही दिवसांवर आली होती, म्हणून ते किल्ले तेथे विकण्यासाठी ठेवण्यात आले होते. जवळ जाऊन मी निरिक्षण केलं. किल्ल्यांवर खुप छान नक्षीकाम केलं होतं. रचना, आकार, आवश्यक घटकांमध्ये वैविध्य होतं, पण कसलीही तक्रार नव्हती. ते किल्ले पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आठवणींमध्ये इतका गोडवा होता की, नकळत चेहऱ्यावर हसू उमटले. मग मी भास्करला विचारलं, ''लहानपणी तू किल्ला बनवायचास का?''
त्याने होकारार्थी मान हलवली, मग मी माझ्या आठवणीच्या विश्वात हरवुन गेलो. मला माझे आठवीला असतानाचे दिवस आठवले. तेव्हा मी आतापर्यंतचा शेवटचा किल्ला बनवला होता.
शेवटची ओव्हर संपल्यानंतर आम्ही घरी जात होतो. त्या दिवशी मी ८६ धावा केल्या होत्या. आमच्या संघाचा कॅप्टन माझ्यावर भलताच खुश होता, तसं पहायला गेलं तर मी सुध्दा कॅप्टन होवू शकलो असतो. पण, मला कसलंही दडपण न घेता, संघाची जबाबदारी न घेता, माझ्या मनाप्रमाणे माझ्या शैलीत खेळायचं होतं. आमच्या बिल्डिंगमधील सगळे मला 'दादा' (सौरभ गांगुली) म्हणत. क्रिकेटमुळे गावामध्ये माझी एक वेगळीच ओळख होती. तर त्या दिवशी देखील नेहमीप्रमाणे आम्ही मॅच जिंकून आईसक्रिम खात बसलो होतो. तेवढ्याात गितेश म्हणाला, ''दादा, दिवाळी आली. गावातली मुलं किल्ला बांधायला घेत आहेत. आपण सुरुवात पण नाही केली.''
''बरं झालं आठवण करुन दिलीस. किती दिवस बाकी आहेत?'' मी आईसक्रिम संपवत विचारलं.
''गावातल्या मुलांनी स्पर्धा पण ठेवली आहे.'' मध्येच चेतन म्हणाला.
''दिवाळीसाठी तीन दिवस बाकी आहेत.'' आकाश म्हणाला.
थोडं बोलून झाल्यावर आजच माती आणून ठेवायची असं ठरलं, इथे मात्र मी प्रमुख असायचो. कारण इथे काम करुन घ्यायचं होतं. काम करण्यापेक्षा करवून घ्यायला मला व्यवस्थीत जमायचं. चेतनने कुठूनतरी तीन गोण्या आणल्या. सौरभ, आकाश, विनित आणि रषेश पाठीमागच्या शेतामधली माती गोण्यांमध्ये भरत होते. त्या चौघांना फक्त गोण्या भरुन ठेवायला सांगितल्या. तिथून त्या बिल्डिंगपर्यंत नेण्याची जबाबदारी गितेश, संदेश आणि गणेशची होती. मी आमच्या सोसायटीच्या बाकावर बसलो होतो. गॅलरीमध्ये उभे असलेले मोरे काका, पवार काका, पाटील काका, मालपुरे काका, मिर्लेकर आजोबा आणि पप्पा मला विचारत होते, दिवाळीच्या किल्ल्याची तयारी कुठपर्यंत आली? म्हणून त्यांनी सुध्दा मला स्पर्धेबद्दल सांगितलं. आमची चर्चा संपुर्ण सोसायटी ऐकत होती. कारण मी मैदानात बाकावर बसलो होतो आणि बाकी सगळे मान्यवर तिसऱ्या मजल्याच्या बाल्कनीमधून माझ्याशी बोलत होते.
![](https://img.wattpad.com/cover/107623405-288-k434676.jpg)
ESTÁS LEYENDO
Night Walk
Historia Cortaआपण वाचत असलेला हा लेखसंग्रह ठरवून लिहिला गेला नाहीये, किंवा या लेखसंग्रहातील लेख देखील एक ठराविक विषय घेऊन लिहिलेले नाहीत. हा लेखसंग्रह म्हणजे माझ्या लहानपणापासून मी लिहिलेले काही निवडक लेख, कथा आहेत. हा लघुकथा संग्रह ३० ते ४० कथांचा सहज करता आला अ...