नाईट वॉक

467 4 2
                                    

अमित आणि मेघना लग्नानंतर मेलर्बन येथे स्थायिक होतात. अमित एका कॉलेजमध्ये प्राध्यापक असतो. मेघनाचं घरापासून जवळच एका कंपनीमध्ये वेब डेव्हलपरचं काम काही महिन्यांनी बंद होतं. दोनचार महिने घरी बसल्यानंतर तिला नोकरी करण्याचा कंटाळा येतो. आता घरी बसून काय करायचं? तेव्हा तिला अमितच्या लहान बहिणीची, स्वातीची आठवण येते. मेघना आणि स्वाती लहानपणीच्या जिवलग मैत्रिणी होत्या. मेघनाच्या लग्नानंतर स्वातीने अचानकपणे तिच्याशी बोलणं बंद केलं होतं. जुन्या गोष्टी विसरुन तिने इथे येऊन आपलं शिक्षण पुर्ण करावं असं मेघनाला वाटतं. ती ही गोष्ट अमितला देखील सांगते. अमित लगेचच स्वातीला आॅस्ट्रेलियामध्ये बोलवून घेतो. विशेष म्हणजे स्वाती तिथे स्थायिक होण्यासाठी होकार देते.

कागदपत्रांची पुर्तता करुन काही महिन्यांतच स्वाती आॅस्ट्रेलियामध्ये येते. अमितने त्याच्याच कॉलेजमध्ये तिच्या अॅडमिशनची व्यवस्था केलेली असते. अमित त्या दोघींना मेलर्बन सफर करवतो, कॉलेज सुरु होण्याआधी तिघेही मनसोक्त धमाल करतात. या सर्व गोष्टींमध्ये स्वाती मेघनाबरोबर अगदी नॉर्मल वागते, जणू काही झालंच नाही. तिघेही एकमेकांसोबत आनंदात राहत होते. दरम्यान अमितला नवीन कोर्सच्या ट्रेनिंगसाठी दोन आठवडे सिडनीमध्ये जावं लागतं. त्याच्या राहण्याची व्यवस्था कॉलेज करत असल्याने तो मेघना आणि स्वातीला तिथे नेऊ शकत नव्हता. दोन आठवडे त्या दोघींची अमितबरोबर भेट होणार नसली तरी, त्या व्हॉट्सअॅप आणि स्काईपवर त्याच्या संपर्कात होत्या. स्वाती असल्याने मेघनाला घरी एकटं जानवणार नाही या विचाराने अमित सुखावला होता.

एकीकडे अमितची ट्रेनिंग सुरु असते तर,दुसरीकडे त्या दोघींची शॉपिंग, शॉपिंग कसलं? दोन दिवासांतच दोघी शॉपिंग करुन कंटाळतात.

असंच एका रात्री साधारण साडेअकरा वाजता सोफ्यावर बसून दोघी टी.व्ही बघत असतात. स्वाती हसतखेळत असल्याने मेघनाच्या मनात एक प्रश्न येतो. सगळं व्यवस्थीत असताना स्वातीने आपल्याशी अचानक बोलणं बंद का केलं याबाबत तिला स्वातीला विचारावंसं वाटतं. पण स्वाती तिच्याशी नॉर्मल बोलत आहे हे बघून ती स्वातीला काही विचारत नाही.

Night WalkOù les histoires vivent. Découvrez maintenant