'पीके' हा सिनेमा त्याच्या नावापासूनच चर्चेत राहिला. सिनेमाच्या नावातच थोडासा वेगळेपणा होता आणि त्यासोबत सिनेमाचे दिग्दर्शन राजकुमार हिराणी करणार होते. आमिर आणि थ्री इडियट्सचा दिग्दर्शक पुन्हा एकत्र म्हणजे दुग्धशर्करा योगच...! पहिल्या मोशन पोस्टर पासूनच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात होता तो अगदी सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर तर हा वाद चांगलाच चिघळला. पहिला वाद झाला होता तो, स्वयंघोषित 'समाजरक्षक' यांच्याकडून आणि सिनेमा प्रदर्शित झाल्यावर हा वाद चिघळला (स्वयंघोषित) हिंदूरक्षकांकडून. तर नक्की काय होतं या सिनेमा मध्ये, हेच आपण थोडक्यात पाहू.
आमिर खानने सिनेमामधील एन्ट्रीसाठी नग्न होणे पसंत केले. त्याच्या हातातील रेडियोने कमरेखालचा भाग झाकलेल्या नग्न पोस्टरवर याअगोदरच समाजसंरक्षकांनी तोंड भरुन टिका केली होती. अगदी काही आमिरद्वेष्टे त्याची तुलना पुनम पांडे आणि सनी लियोनेशी करुन देखील मोकळे झाले होते परंतु सिनेमाची गरज असल्याशिवाय आमिर खान पुर्णपणे नग्न होण्याचा टोकाचा निर्णय घेणार नाही. फक्त दुस-या ग्रहावरील लोक कपडे वापरत नाहीत हे दाखवण्याकरता आमिरला नग्न व्हायची काय गरज...? परग्रहातील लोक अंतराळयानाचा शोध लावत असतील तर त्यांना कपड्यांचा शोध लागु नये, हे कुठेतरी तार्किकद्रुष्ट्या मनाला पटत नव्हते. सिनेमाभर वावरताना पीकेचा दिसलेला भाबडेपणा आणि या नग्नतेचा काही संबंध असेल का...? पीके ज्या ग्रहावरून पृथ्वीवर आला होता त्या ग्रहातील लोकांची कोणतीही भाषा नव्हती. समोरच्या व्यक्तीचा हात हातात घेऊन ते त्या व्यक्तीच्या मनाचा कांगोवा घेत असत. त्यांच्यात कोणत्याही बाबतीत लपवाछपावी, खोटारडेपणा अशा गोष्टी होत नसत. थोडक्यात त्यांच्या दैनदिन व्यवहारामध्ये नागडेपणा होता. लहान मुल हे नग्न असत आणि ती नग्नता आपल्यापैकी कोणालाच अश्लीलता वाटत नाही कारण त्या लहान मुलाला आपण भाबडं समजत असतो. लहान मुलालाही त्याचे वर्तन चुकीचे वाटत नाही कारण तोपर्यँत त्याचा 'लज्जा' या शब्दाशी परिचय झालेला नसतो. समाजात वाढु लागल्यावर, दुनियादारीशी संपर्क आल्यानंतर, जेव्हा 'लज्जा' या शब्दाचा अर्थ त्या लहान मुलास कळु लागतो तेव्हा ते केवळ लज्जारक्षणाखातर कपडे परिधान करते. त्याच वेळी त्याच्यातील भाबडेपणा संपलेला असतो. त्यामुळे मनातुन भाबडे असलेले (म्हणजेच मनाचा नागडेपणा असलेले) पीके जेवढ्या जास्त संख्येने निर्माण होतील, तेवढ्या जास्त प्रमाणात आपला समाज निकोप जीवन जगण्यास प्रगल्भ होईल, असेच काहीसे आमिरला सुचवायचे असेल.
CZYTASZ
Night Walk
Krótkie Opowiadaniaआपण वाचत असलेला हा लेखसंग्रह ठरवून लिहिला गेला नाहीये, किंवा या लेखसंग्रहातील लेख देखील एक ठराविक विषय घेऊन लिहिलेले नाहीत. हा लेखसंग्रह म्हणजे माझ्या लहानपणापासून मी लिहिलेले काही निवडक लेख, कथा आहेत. हा लघुकथा संग्रह ३० ते ४० कथांचा सहज करता आला अ...