मॉन्स्ट्रोसिटी - भाग 1

1.5K 6 1
                                    

मॉन्स्ट्रोसिटी

- मुख्य पात्रे -
डेव्हिड, आरोमा, रॉबर्ट, मोनिका, सोफिया, जेम्स, सारा


स्थान - सिडनी, ऑस्ट्रेलिया
वेळ - रात्रीचे साडे अकरा

आज नानासाहेब देशमुख सकाळी सहा वाजताच उठुन बसले होते, ऑस्ट्रेलियात असलेला त्यांचा एकुलता एक मुलगा डेव्हिड याला त्यांना फोन करायचा होता. इकडे डेव्हिड ऑफिसमधल्या दिवसभरच्या कामाने मुळे काहीसा थकुनच रूम वर आला होता. आज त्याला रूम वर यायला रात्रीचे साडे अकरा वाजले होते. येताना डिनरसाठी त्याने फुल साईज बर्गर पार्सल आणला होता. कालचा पिज्जा फ्रिजमध्ये तसाच शिल्लक होता. आज बर्गर आणि पिज्जा खाऊन थोडी बिअर घेत मस्तपैकी ताणुन द्यायचा विचार करत फ्रेश होण्यासाठी बाथरूमकडे वळताच त्याचा फोन वाजला. रिंगटोनवरुन त्याला कळाले की पप्पांचाच फोन आहे. त्याने फोन उचलुन कानाला लावला.

“हॅलो पप्पा.. बोला”

“डेव्हिड, हाऊ आर यु माय सन?”

“आय ॲम गुड पप्पा, हाऊ अबाऊट यु?”

“आय ॲम आल्सो गुड बेटा, तुझ्या आवाजाला काय झाले?”

“काही नाही हो पप्पा, आज ऑफिसमधुन रूम वर यायला थोडा उशिर झाला, तुम्ही सकाळी लवकर उठुन बसला की काय मला कॉल करायला?” डेव्हिड हसत म्हणाला.

“अरे, मला सवय आहे सकाळी लवकर उठायची, बरं, ते जाऊ दे, मी काय म्हणतोय, तु कधी येतोयस इकडे ते सांग आधी.”

“पप्पा मी लवकरच माझ्या मित्रांबरोबर येतोय तिकडे. माझ्या ऑफिसमधल्या मित्रांसोबत ट्रिप चे प्लानिंग करतोय मी.”

“नक्की येणार ना? थोडी विश्रांती सुद्धा होईल आणि मला सुद्धा इतक्या वर्षांनी तुला भेटायचे होईल रे..” - देशमुख इमोशनल होत म्हणाले.

“ओह कम ऑन पप्पा, तुम्ही का उदास होता? मी लवकरच निघतोय इथुन तुम्हाला सरप्राईज व्हिजिट द्यायला. तुम्हाला माहिती देखील होणार नाही आणि मी तुमच्यासमोर एके दिवशी सकाळी उभा असलेला दिसेन.” - डेव्हिड उत्तरला.

मॉन्स्ट्रोसिटीDonde viven las historias. Descúbrelo ahora