डेव्हिड चा राग साहजिकच होता. या सर्वांच्या आसपास घडत असलेल्या घटना इतक्या वेगाने झाल्या की कुणी सामान्य माणुस पुरता भांबावुन स्वत:चा आत्मविश्वास गमावुन बसला असता. डेव्हिड ने स्वत:च्या डोळ्यांनी जे काही पाहिले होते त्याचा राग भुतावळींवर निघणे साहजिकच होते. फक्त मोनिकाच्या हस्तक्षेपामुळे स्वत:वर कंट्रोल करुन त्यांना जाळुन मारण्याचा प्लान डेव्हिड ने रद्द केला होता. तो तिथेच बसुन राहिला. इतक्या वेळेपासून जी दृष्यं पाहिली होती, जितकी धावपळ झाली होती त्याने डेव्हिड च्या अंगाचा एक आणि एक अवयव अक्षरश: ठणकत होता.
वाचकहो, आपल्यासारखा कुणी त्याच्या जागी असता तर या भुतावळींना जाळुन तिथेच त्यांचा कार्यभाग उरकला असता. मात्र डेव्हिडच्या सहनशक्ती ची आणि मोनिका वर असलेल्या प्रेमाची दाद द्यावी तितकी कमीच. त्या जेलवजा खोलीसमोर पहारा देत बसल्या बसल्या चॉकोलेट बार खाऊन झाल्यावर डेव्हिडला डुलकी लागली. त्याच्या हातातील लायटर हळुच निसटुन जमीनीवर स्थिरावले. दोन्ही पाय पसरुन पाठ भिंतीला टेकवुन तो तसाच पसरुन राहिला.
इकडे तिनही मुलींची बॅटरीसाठी शोधाशोध मोहिम अजुनही चालूच होती.
Friends, इथे काहीच नाहीये - सारा तक्रारी सुरात धुळीने माखलेले हात झटकत म्हणाली. ही इमारत इतकी मोठी आहे की आपल्याला बाईकच्या लहान बॅटरीज शोधायला भरपूर वेळ लागेल. - सारा.
I think we should pick up another room and search again, ही एक खोली झाल्यावर दुसरी खोली पाहुया - सोफिया.
नको, या धावपळीत आपल्या अंगातील ताकद आधीच कमी झालीय. आपल्याला विश्रांतीची सक्त गरज आहे. डॉक्टर्स च्या रूम्स मध्ये आपण थोडावेळ आराम करु. सकाळ होताच आपण इथुन चालत निघायचे. - मोनिकाने एका दमात सर्व सुचना देऊन टाकल्या.
बाकी दुसरा पर्यायच नव्हता. एव्हाना सगळेच थकुन गेले होते. बेडवर पडताक्षणी झोप लागेल अशी सर्वांची अवस्था झाली होती. मोनिकाच्या सुचनेनंतर सारा आणि सोफिया तिच्यासोबत थोडा आराम करण्यासाठी निघुन गेल्या.
VOCÊ ESTÁ LENDO
मॉन्स्ट्रोसिटी
Terrorआता डेव्हिडला शेवटचा पत्ता उचलायचा होता. यावेळी डेव्हिडने सर्वात शेवटच्या पत्त्यावर बोट ठेवले.. त्या स्त्री ने पुन्हा आधीच्या पत्त्यांसारखे तो पत्ता सुद्धा उचलुन पाहिला. पत्ता पाहताक्षणी तिच्या चेह-यावरचा रंग उडाला. तिचे स्मितहास्य गायब झाले. तिचा ह...