मॉन्स्ट्रोसिटी - भाग 7

63 0 0
                                    

डेव्हिड आणि तीनही भुतावळ गायब असलेले पाहुन मोनिकाची अक्षरश: पाचावर धारण बसली. भितीने नखशिखांत भिजुन ती आल्या वाटेने पुन्हा पळत सुटली. फक्त विचारानेच थरकाप होत तिच्या अंगावरुन घामाच्या धारा वाहु लागल्या. तशाच अवस्स्थेत सुसाट वेगाने पळत ती रूम च्या दरवाजा पर्यंत कशीबशी पोहचली.

दरवाजा उघडाsss.. लवकरss... - मोनिका दार ठोठावत मोठ्याने किंचाळू लागली. आत झोपलेल्या या दोघी तिच्या किंचाळण्याचा आवाज येताच खडखडीत जाग्या झाल्या. दोघींना काहीच समजेना. सोफिया तत्परतेने पुढे होत दरवाजातुन कानोसा घेऊ लागली.

प्लीजsss.. दरवाजा उघडा लवकर प्लीजssss....
- मोनिका किंचाळतच होती.

आता मात्र सोफिया ने क्षणाचाही विलंब न लावता लॉक ओपन केले. अर्थातच, रूम मध्ये सोफिया च्या जागी फक्त "सारा" असती तर तिने भितीपोटी मोनिका आणि सोफियाला आत पाऊल सुद्धा ठेवायला दिले नसते. तसं पहावं तर सारा आपल्या आजुबाजुला होत असलेल्या गोष्टींनी कमालीची भेदरुन गेली होती. तरीही अशा प्रसंगात तिने एकटीने अंधारात दबा धरुन भुतावळी समोर कंदील फोडत आग लावायची कामगिरी अतिशय चोख बजावली होती. सोफिया ने लॉक ओपन करताच मोनिका विजेच्या गतीने आत घुसली आणि लॉक पुन्हा होते तसे लावले.


ते सगळे गायब आहेतSsss...
- मोनिका धापा टाकत ओरडु लागली.


काय??? - सोफिया आणि मोनिका जीवाच्या आकांताने किंचाळल्या.


आणि डेव्हिड?? - सोफिया.

तो.. तो सुद्धा गायब आहे - मोनिका दरवाजाला पाठ टेकुन धापा टाकतच होती.


हे ऐकल्यावर आता मात्र त्या दोघींच्या अंगातील उरली सुरली ताकद सुद्धा संपुष्टात आल्यासारखे जाणवु लागले.


आता..? आता आपण काय करायचे..? - सारा


डेव्हिड ने रागात त्यांना खरोखरच जाळुन तर टाकले नसेल ना? - सोफिया विचार करत म्हणाली.


त.. त्याने जर जाळले असते .. तर तो आपल्याकडे परत आला नसता का..? - मोनिका आपला श्वास कंट्रोल करत स्पष्टीकरण देत म्हणाली.

मॉन्स्ट्रोसिटीWhere stories live. Discover now