डेव्हिड धापा टाकत कसाबसा स्वतःला सावरत पुन्हा पायऱ्यांजवळ आला.
कुठाय तो? - मोनिकाने विचारणा केली.
त्या... त्या.. हरामखोरांनी त्याला.. टेबलावर बांधुन.. उताणे झोपवलय.. - डेव्हिड धापा टाकत सांगू लागला. ते ऐकताच सगळ्यांच्या चेहऱ्यावर भिती दाटुन आली. डेव्हिड पुढे सांगु लागला - ते सगळे मिळुन त्याचे दंड, छाती, मांडी चाकुने सोलून काढतायेत.. आणि उकळत्या तेलात... तळुन खातायेत.. - डेव्हिडने एका श्वासात सगळे सांगुन टाकले. एव्हाना त्याच्या संपुर्ण अंगावर सांडलेले रक्त त्वचेवरील घामाचा देखील रंग बदलत चेहऱ्यावरुन ओघळत होते. डेव्हिडचे ऐकुन सारा आणि सोफियाने तर रडत तोंडावर हातच ठेवला.
ते एकुण किती जण आहेत? - मोनिकाने स्वत:ला सावरत विचारले.
तिघे आहेत, त्यातला एकजण खुपच ताकदवान अगदी राक्षसासारखा आहे आणि बाकीचे दोघे त्याचे चेले वाटतायेत. त्यांच्या किरट्या हसण्याचा आवाज माझ्या कानात अजुन घुमतोय.... - डेव्हिड आपले दात एकमेकांवर दाबत रागाने सांगु लागला.
तु आधी शांत हो. आता आपल्याला थंड डोक्याने प्लान करायचा आहे. मोनिका सर्वांना सांगु लागली - आपण आधी त्यांना कसेही करुन Ward-C पर्यंत आणुया. तिथे रॉकेलने भरलेले दोन कंदील आहेत. सारा.. तु तो कंदील घेऊन Ward-C च्या दरवाजा जवळ अंधारात लपून बस.. मी, डेव्हिड आणि सोफिया तिघेही त्यांच्या मागे जोरात ओरडत जाऊन चाकुने हल्ला चढवतो आणि त्यांना Ward-C जवळ यायला भाग पाडतो. ते तिघेही तुला दिसताच हातातील एक कंदील फोडुन तु त्यांच्या बाहेर जायच्या रस्त्यावर आग लाऊन दे जेणेकरुन ते आगीला घाबरुन Ward-C च्या पॅसेज मध्ये घुसतील. मग आपण त्यांना बाहेरुन लॉक करु. - मोनिका ने तिचा योजनाबद्ध प्लान सांगितला.
ठीक आहे. आधी मी जातो - डेव्हिड त्याच्या जवळच भिंतीवर अडकवलेला लाल रंगाचा लोखंडी फायर पंप हाताने उचलत म्हणाला. तुम्ही सगळे माझ्या मागे या - डेव्हिड.
चौघेही एक एक पायरी उतरत पुन्हा त्या दिशेने निघाले. मोनिकाने Ward-C च्या जवळ असलेल्या कपाटातील दोन्ही कंदील आणि लायटर घेऊन सारा ला अंधारात लपून बसायची खुण केली. सारा किंचीतही आवाज न करता दबक्या पावलानी पुढे निघुन गेली. डेव्हिड च्या मागे आता मोनिका आणि सोफिया हळुवारपणे चालत किचनकडे जात होत्या. दोघांनी आपल्या हातात अणकुचीदार चाकु अगदी हल्ल्याच्या पोझिशन मध्ये पकडले होते. डेव्हिडने दोन्ही हातात वजनदार लोखंडी सिलेंडर पकडत किचनमध्ये प्रवेश केला.
KAMU SEDANG MEMBACA
मॉन्स्ट्रोसिटी
Hororआता डेव्हिडला शेवटचा पत्ता उचलायचा होता. यावेळी डेव्हिडने सर्वात शेवटच्या पत्त्यावर बोट ठेवले.. त्या स्त्री ने पुन्हा आधीच्या पत्त्यांसारखे तो पत्ता सुद्धा उचलुन पाहिला. पत्ता पाहताक्षणी तिच्या चेह-यावरचा रंग उडाला. तिचे स्मितहास्य गायब झाले. तिचा ह...