मॉन्स्ट्रोसिटी - भाग 2

617 5 0
                                    

आता डेव्हिडची टोळी त्यांच्या चारही गाड्या पार्क करण्यासाठी जागा शोधत होती. सर्वत्र उंचच उंच झाडे आणि बर्फाचा खच पडला होता. जर रात्रभर गाड्या तिथे राहिल्या असत्या तर दिवस उजाडेपर्यंत त्या बर्फाखाली जाम होणार हे सर्वांना माहिती होते. डेव्हिड आणि जेम्स कानोसा घेत चांगली भुईसपाट आणि आडोसा असलेली जागा शोधु लागले. पुर्ण इमारतीला वळसा घालतच ते तिची प्रदक्षिणा करु लागले.

त्या सर्वांना ही इमारत लांबुन खुपच लहान वाटली होती. पण आता जवळ आल्यानंतर ती त्यांना काहीशी भव्य आणि किंचीत भयानकही वाटु लागली. ब-याच प्रयत्नानी शोधाशोध करुन दोघांनी अखेर इमारतीच्या मागे असलेले एक उंच लाकडाचे शेड शोधुन काढले. ज्याच्या खाली ते आपल्या गाड्या सुरक्षित पार्क करु शकणार होते. दोघांनी मिळुन तिथला पालापाचोळा पायानेच ढकलत साफ केला. दहा ते पंधरा मिनिटे शेडमधील जमीन साफ करण्यात गेल्यानंतर आता डेव्हिडला समाधान झाले. कारण त्यांचा परतीचा प्रवास गाड्यांवरुनच होणार असल्याने त्यांची सुरक्षितता महत्वाची होती. आणि हलगर्जीपणा डेव्हिडच्या स्वभावात नव्हता.

आता डेव्हिड आणि जेम्स दोघेही परत इमारतीच्या मुख्य दरवाज्याजवळ त्यांचीच वाट पाहत उभे असलेल्या टोळीकडे आले.

कम ऑन फ्रेंड्स.. गाड्या पार्क करायला आम्ही एक जागा शोधलीय. बर्फाचे तुफान आपल्याकडे यायच्या आत सगळेजण आपापल्या गाड्या घेवुन माझ्या मागे या.. - डेव्हिड त्याच्या गाडीवर उडी मारुन बसत म्हणाला. 

सर्वांनी आपल्या गाडीच्या स्टार्टरची मोठी चेन हिसक्याने दोन तीनदा खेचत परत गाडी सुरु केली. आणि ते डेव्हिडच्या पाठोपाठ निघाले.

इतक्या लांब गाड्या पार्क करायच्या? - गाडी चालवतच रॉबर्टचा प्रश्न

तुला दुसरी कुठे जागा सापडतेय का?
मग तिकडे लाव जा गाडी तुझी.. जा लवकर..
- जेम्स त्याला टोमणा मारत म्हणाला.

काय रे तु सुद्धा… आळशी आहेस बघ एक नंबरचा.. चल ना आता..
असं किती लांब आहे इमारतीच्या पाठीमागेच तर जायचं आहे.
- अरोमा रॉबर्टच्या पाठीत बुक्की घालत म्हणाली.

मॉन्स्ट्रोसिटीDonde viven las historias. Descúbrelo ahora