मलमली तारुण्य माझे - भाग एक

4.6K 11 4
                                    

शिमल्याच्या मॉल रोड ला ध्वजवंदनाचा कार्यक्रम चालू होता .. प्रेम सरदेसाई खिडकीतून सावधान अवस्थेत उभे राहून ते बघत असतानाच सलामी दे अशी आरोळी झाली आणि त्यांनी सलामी दिली ... थोडा स्तब्ध वेळ गेला आणि ते विश्राम अवस्थेत आले ... आणि दारावरची बेल वाजली ...

येस कम इन !!!

पुन्हा बेल वाजली ...

प्रेम आपल्या जागेवरून उठला आणि सरळ दाराकडे गेला .. साधा पांढरा कुर्ता आणि पायजामा घातेलेले पन्नाशीतलं व्यक्तिमत्व .. केस थोडे पांढरे झालेले .. नुकतीच केलेल्या शेव्हिंग मुळे गुळगुळीत चेहरा ... चेहऱ्यावर हलकं मॉइस्चराइसर .. हातात घड्याळ पायात चप्पल विशीतली चालण्याची लकब .. जर केस काळे केले असते तर कुणीही तिशीतला तरुण समजले असते .. एखाद्या क्रिकेटर ला शोभेल अशी रिस्ट .. डोळ्यात अस्पष्ट करुणाभाव .. सपाट पोट .. रुंद खांदे .. आणि झपझप पावलं टाकत त्यांनी गाठलेला दरवाजा .. जो त्यांनी अलगद उघडला .. आणि म्हणाले

कोण हवय तुम्हाला ?

वय वर्ष सतरा असेल तिचं .. प्रेम ने ते अचूक हेरलं असेलही कदाचित? कुणास ठाऊक!!! पण लांब सडक केस ..रेशमी काळे लांब केस , डोळ्यावर कातीव भुवया, बदामी डोळे, सरळ नाक , कातीव गुलाबाच्या पाकळ्यागत ओठ .. त्यावरचं हलकं अळंबी लिपस्टिक .. गौरवर्ण , थोडा उभट चेहरा मेक्सिकन ब्युटी सारखा .. कानात छोटे इअर रिंग्स , नाकात नोज स्टड.. आजकाल जे दिसत नाही .. लयदार शरीरयष्टी .. जशी चित्रकार राजा रवी वर्मा ने रेखावी तशी .. प्रेमसमोर भांबावून उभी होती ..


सॉरी .. मला वाटलं हि माझ्या मित्रांची रूम आहे ..

अच्छा !!! नाव काय आपलं ..

स्वराली .. एका मंजुळ आवाजात ओठांची एक विशिष्ट हालचाल करत ती बोलली .. सोबत पायाच्या हालचाली पण होत्या ..

सॉरी मी तुम्हाला त्रास दिला

नाही तसं काही नाही .. मी तुला काही मदत करू का ?

मलमली तारुण्य  माझेWhere stories live. Discover now