मलमली तारुण्य माझे- भाग चौदा

181 1 0
                                    

प्रेम फोन उचलणार तेवढ्यात निशा त्याला म्हणाली ... नको .. आज फक्त माझा हक्क आहे तुझ्यावर 


कां ग ? आज काय आहे असं ?

ते मला नाही माहित .. पण अपुनने बोला तो बंबोला .. समजेका अपुन हो प्रेम भैईया 

आणि निशा अक्षरशः हसत सुटली ... 


२० वर्षांपूर्वी मिळालेला प्रेम आणि आताचा प्रेम ह्यात जमीन आस्मानच अंतर होतं ... प्रेमशी मैत्री करण्यात निशाला काहीच कमीपणा वाटला नव्हता पूर्वीपण नाही आणि आता तिला कधी त्याचा हेवा वाटत नव्हता .. कारण दोघांचीही मैत्री हि मनातून केलेली मैत्री होती .. कित्येकदा धसमुसुन रडलेलो एकमेकांच्या मिठीत .. अशी हि मैत्री .. काही छोटासा आनंद झाला आणि तो पण एकत्र शेयर केला ... अशी हि मैत्री ...


आज माहित आहे का काय आहे ?

काय? प्रेम विचारांचा गुंता सोडवत बोलला 

ये तू असा काही विचारात असशील तर मेंदू सिमल्याला ठेवून बोलू नकोस 

अरे !!!! बोल

काय आहे आज ?

मला नाही माहिती ... 


आज फ्रेंडशिप डे आहे...  मूर्ख कुठला 

हो !!! मी विसरुणंच गेलो 

तू आहेच असा बावळट  


बोलता बोलता कसा वेळ गेला कळलंच नाही ... प्रेम ने आपल्या स्टाईल ने पोहे बनवले आणि दोघांनीही मनसोक्त गप्पा मारल्या ..गप्पांचा ओघ भरात आला होता ... 

कसं चाललंय .. काय म्हणतात विनयराव ?

विनयराव ? काय म्हणणार .. खुश आहेत .. मात्र निशाच्या चेहऱ्यावर दुःखाचे भाव होते आणि ती काही तरी लपविण्याचा प्रयत्न करत होती ... 

मलमली तारुण्य  माझेМесто, где живут истории. Откройте их для себя