मलमली तारुण्य माझे - भाग चार

1.1K 5 2
                                    



मी निशाकडे चहा घेऊन माझ्या रूम मध्ये गेलो माझी रूम चौथ्या माळ्यावर होती आणि समोर एक बिल्डिंग होती .. ऊन येणार नव्हतंच कारण दोन्ही बिल्डिंग मध्ये हार्डली काही फुटांचं अंतर होतं ...मी रूम स्वच्छ केली होती .. त्यात एक ऐसपैस खिडकी होती आणि मुंबई स्टाईल त्या खिडकीला समोर ग्रील ने एक्सटेन्ड केलं होतं .. ज्याने रूम सोडली त्याने त्यातील कुंड्या तश्याच ठेवून गेला असावा मी त्यांना स्वच्छ केलं आणि त्यात एक मस्त पैकी मोगरा लावला .. मला खूप आवडायचा मोगरा .. आमच्या घरी मी मोगऱ्याची बॅग केली होती गावाला ... आणि त्यातली फुलं मला कधीच दिसली नाही ह्याची खंत जरी असली तरी समाधान असायचं कि गावातल्या कुणाच्यातरी घरी देवावर किंवा कुणाच्या सुंदर जूड्यावर ती सजली असतील .. खंत याची कि त्यांना ते उमलू पण द्यायचे नाहीत आणि कळ्या असतानाच ते खुडून टाकायचेत .. आणि एका बाजूला तुळशीचं झाड लावलं ..तुळशीच्या पानाचा अर्क टाकून अद्रक तुलसी चाय .. आह्ह्हा त्याची मज्जाच काही और ... एका बाजूला माझा देव्हारा होता ... कसा खाली खाली वाटतो ना ? मी स्वतःलाच प्रश्न केला आणि स्वतःच मनात म्हटलं येतील देव पण !!! मी एका बाजूला माझी बैठक केली होती कोपऱ्यात .. एक सतरंजी घडी करून टाकली होती .. आणि समोर एक छोटासा पाट मला अभ्यास करता येईल लिहता येईल असा ... एका बाजूला माझं छोटंसं किचन होतं .. त्यात एक स्टोव्ह आणला होता वातीचा आणि एक दोन भांडी काही मसाले आणि थोडं फार काही धान्य ... जगण्यापुरतं होतं .. मला तेही राजमहाल वाटायचा .. मी त्यात एक टेपरेकॉर्डर आणला आणि त्यात काही कॅस्सेट .. आज पेनड्राईव्ह आणि चिप च्या युगात ती कॅसेट अडकली म्हणून रिवाईंड करत गाणं ऐकण्याची गम्मत हरवलीय ... त्यात मग कॅसेट किरायाने मिळायच्यात .. दोन कॅसेट पाच रुपयाला २ दिवस.. मनसोक्त ऐकता यायचं .. तेंव्हा मोबाईलची पाळत नव्हती कि त्याचं एडिसिशन नव्हतं ... चहा पीत पहाटे .. छान शहनाई वर राग ऐकण्याचा आनंद तेंव्हा स्वर्गसुखाहून कमी नव्हता ..

मलमली तारुण्य  माझेDonde viven las historias. Descúbrelo ahora