मलमली तारुण्य माझे - 24

189 1 1
                                    


ये माय माझी .... इकडे ये
काय झाल डॉक्टर साहेब? .. आतापर्यंत जोशात असलेली शर्वरी आता एकदम दिन पने म्हणाली.. खूप थकलेली दिसत होती ती .. तिच्या सुंदरश्या ओठांवर सुकल्याच्या खुणा दिसू लागल्या होत्या .. कदाचित केव्हापासून ती पाणी पण प्यायली नव्हती .. दामूची पण अवस्था तशीच होती ...
हे बघ पेशंट हि माहिती हवी आहे .. आणि हो ह्याला किती दिवस ठेवावे लागेल माहित नाही आणि औषध पण लागेल .. खर्च खूप येईल .. तो खर्च तू कसे करणार ..
किती येईल खर्च साहेब ?
डॉक्टर आश्चर्य चकित झाले .. हा ह्यांचा कोणी नसताना पण हि बया खर्च किती लागणार हे विचारतेय
२ एक लाख साधारणतः .. बल्लाळ बोलते झाले कारण तो त्यांचा पेशा होता पण कुठेतरी मनाला त्यांच्या टोचणी लागली होती
ये दाम्या .. एक काम कर .. जा घरी आणि त्या जाईच्या झाडाखाली ४ फूट खण .. अन हो इब्लिसपणा करू नकोस .. त्यात तुले एक मडकं भेटण ते काढ अन आण माझ्याकडे .. जा
दाम्या तिच्याकडे बघतच राहिला .. घरी या बाईनं कधी भाकरीसोबत ठेच्यावर तेल नाही घेतलं .. कधी भाकरी शिवाय जेवली नाही .. कधी दिवाळी ला गॉड धोड नाही ... मग हिने जमा काय केलं ..
दाम्याकडून नजर बाजूला करून तिने थोडी बाजूला झाली आणि आपल्या कमरेला हिसका देत एक करदोडा बाहेर काढला जो सोन्याचा होता .. खूप जुना असावा कारण त्यावर किटन चढलं होतं ..
डॉक्टर साहेब यात होईन का तो पर्यंत ?
डॉक्टर बल्लाळांना रडू आवरलं नाही .. पापणीवरचा थेम्ब पुसत म्हणाले ते मी बघतो तू ते आपल्याजवळ ठेव आणि तुम्ही पहिले काही खाऊन घ्या .. बाजूला एक रूम आहे तिथे मी तुम्हाला सोया करून देतो ..
दाम्याला अजून भान नव्हतं .. त्याने शर्वरीचा हात पकडला आणि म्हणाला ... मागच्या जन्मात कोण होतीस माहित नाही पण आता मात्र तू मला देवीचा अवतार वाटू लागली आहेस ..
ये बैताड बोन्ग्या .. कायचं लावलं तुन देव अन बिव ... माणूस हावो .. माणसासारखं वागतुय .. चाल दोन रोट्या हादड अन पय गावाले
एवढ्या रात्री ? दाम्या बोलला
हाय .. मंग काय तुले कुत्रे खाणार हायेत का? ... चल पय
दोन रोट्या गेल्यावर मात्र दोघांनाही झोप आवरली नाही .. खूप सारे दिव्य पार पाडून ते  दोघेही बसले होते आणि बसल्याबसल्याच त्यांना झोप लागली ...
पहाट होत आली होती डॉक्टर बल्लाळ आपल्या सोफ्यावरच झोपून गेले होते .. आणि पहाटेच त्यांना कोणीतरी बेल वाजवून उठवलं ... बघतात तर रात्र पाळीची नर्स होती ..

Has llegado al final de las partes publicadas.

⏰ Última actualización: Sep 09, 2024 ⏰

¡Añade esta historia a tu biblioteca para recibir notificaciones sobre nuevas partes!

मलमली तारुण्य  माझेDonde viven las historias. Descúbrelo ahora