काय केलेस हे आणि का ?
तिचा सरळसोट प्रश्न त्याच्या वर्मी लागला .. तो ततपप करायला लागला .. मी काही नाही केलं ...
मला जास्त शहाणपण शिकवू नकोस ? निशाचा आवाज धारदार झाला होता .. असं व्हायला नको कि मला कुंकू पुसावे लागेल
तू काय बोलतेस हे निशा तुला कोणी सांगितलं हे
मला पोलिसांनी त्यांना तुझा संशय आलाय आणि मी त्यांना खरं तेच सांगणार आहे
नाही असं करू नकोस ... समोरून त्याने फोन कट केला आणि निशा चरफडत राहिली .. तिने लगेच सत्यभामा शिंदेला फोन करून सांगितलं
मात्र त्यानंतर फोन करू कि नको हा निशाला प्रश्न पडला .. तिने तीन वेळा नंबर टाईप केला आणि तीन वेळा मिटवला ... मात्र न राहवून तिने तो नंबर डायल केलाच
लाल शिफॉनच्या साडीतील स्वराली आपल्या रूम मधील गॅलरीत उभी होती पावसाच्या धरणी हिरवळलेला निसर्ग तिला गुदगुल्या करत होता .. ती त्या निसर्गाचं सौन्दर्य बघताना कालच्या आठवणी मध्ये गुंतून गेली होती .. तिला त्या रेशमी स्पर्शची गोडी अजूनही ताजी भासत होती ..ती क्षण आठवला कि तिला अंगावर शहरे येऊ लागले होते .. ती त्या रेशमी स्पर्शची आठवण काढत मलमली तारुण्य गुणगुणत होती तेवढयात तिच्या फोनची रिंग वाजली
काय करतेस ?
काही नाही
म्हणजे
काहीच नाही
तुला काय वाटलं प्रेमला आपल्या जाळ्यात ओढशील
म्हणजे
म्हणजे म्हणजे काय करतेस स्वराली ?
मला तुम्हाला काय म्हणायचंय कळत नाही
जास्त शहाणपण करू नकोस ..
तिकडून एकदम शांतता पसरली होती
हे बघ तू १७ ची प्रेम ५० चा .. मला कळत नाही आहे का तुझे इरादे .. हे बघ स्वराली
तसं काही नाही हो
काय तसं काही नाही तुझा डोळा त्याच्या पैश्यावर आहे ना ? किती पैसे हवे तुला मला सांग मी द्यायला सांगते प्रेमला .. पण तू मैथिलीची जागा घेऊ शकत नाही .. मी पुन्हा प्रेमच घर मैथिलीने भरून टाकलय.. तुझा नामशेष मिटवून टाकलाय .. समजलं आणि हो मला ना सांगता तू त्याला खंडाळ्याला का घेऊन गेलीस ? एक लक्षात ठेव प्रेमवर माझा हक्क आहे तुझा नाही .. कळलं का ?
मी कुठे हक्क सांगतेय त्याच्यावर ? स्वराली रडवेली होऊन बोलली
हे बघ हे रडण्याचं साधेपणाचं नाटक माझ्यासमोर नको समजलं ...
आणि आता लवकर प्रेमला घेऊन ये इकडे आजच्या आज ... कळलं का ? नाही तर कुठे आहेस हे तुझ्या मावशीला सांगेल
हो येतेच मी
स्वरालीला आता रडू फुटायला लागलं होतं .. तिने कधी असा विचारही केला नव्हता .. तिने रडत जाऊन आपले शरीर बेड वर झोकून दिले .. मन तर केंव्हाच प्रेमला दिले होते ... तेवढ्यात तिच्या दारावरची बेल वाजली
तिने डोळे पुसले चेहऱ्यावर पाणी मारलं आणि ती दार उघडायला आली
समोर बघते तर प्रेम होता ..
हं .. काय झालं
काही नाही !!
मग डोळे का असे दिसत आहेत
काही नाही
प्रेम आपण जायचं का मुंबईला
मुंबईला कशाला ?
थांब दोन चार दिवस .. माझा त्रास झालाय का काही
नाही तसं नाही
मग कसं आहे
पुढच्या आठ दिवसात प्रेमच घर व्यवस्थित झालं तसं
संशय खरा ठरला होता पोलिसांना पुरावे मिळाले होते आणि त्यांनी तिच्या नवऱ्याला पुण्यावरून ताब्यात घेतलं होत...
ESTÁS LEYENDO
मलमली तारुण्य माझे
Romanceमलमली तारुण्य माझे,तू पहाटे पांघरावे मोकळ्या केसात माझ्या,तू जीवाला गुंतवावे लागुनि थंडी गुलाबी,शिरशिरी यावी अशी ही राजसा माझ्यात तू अन्मी तुझ्यामाजी भिनावे