मलमली तारुण्य माझे - भाग पंधरा

171 1 0
                                    

बाहेर पावसाच्या धारा पडत होत्या .. मोगरा फुलाला होता त्याचा सुगंध संपूर्ण घरात दरवळत होता .. खिडकीच्या काचांवरून पाण्याचे थेम्ब ओथंबून वाहत होते .. ती अलगद त्या थेंबाच्या ओघळत्या स्पर्शाला न्याहाळत होती .. मग लगेच ती मोरासारखी त्या पावसाच्या थेंबाला एकवटायला गॅलरीत गेली ...  लाल शिफॉन च्या साडीतील ते सौन्दर्य .. नक्षिदार वलयानीमनाच्या कोपऱ्यापर्यंत शहरणार ते रूप .. लांब सडक केस ओले चिंब .. अंगाला तंग असं ब्लॉऊस .. केसाला मोगऱ्याचा गजरा ... गॅलरीच्या एका बाजूला विशिष्ट लकबीत उभी असलेली ती सुंदरा .. बाजूला मोगऱ्याचा वेल.. रिमझिमता पाऊस त्यात केसांतून निथळणारे मोत्या सारखे थेम्ब .. निथळताना गोऱ्यापान पाठीवरून साडीच्या पदराला आणि अंगाला एक जीव करणारे ते थेम्ब .. पाषाणाच्या मनाला सुद्धा पाझर फोडतील असे ते लाघवी सौन्दर्य ... अलगद कोनातून बघणारी ती नजर ... त्या ओल्या चिंब रेशमी केसातून हळुवार पने प्रेमने पेरलेले बोट ... अलगद कानाच्या पाळीला लावलेले ओठांचे मध ... आणि मग ... 


पहाटेचा थंडावा गॅलरीत उभ्या असलेल्या घामाझोकाळ प्रेमला अंगावर काटे उभेकरत होता .. असं कस झालं हे त्याला पण कळत नव्हतं आणि तो संपूर्ण चिंतातुर अवस्थेत आपल्या आराम खुर्चीत बसून होता ... त्याला पडलेलं स्वप्न त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं ... पुन्हा एकदा ते स्वप्न त्याला आठवून आठवून अस्वस्थ करत होतं .. 


त्या सुंदर रेशमी केसांतून येणारा मंद शिकाकाईचा सुगंध .. त्याचे त्या केसांमधून फिरणारे बोटं .. मैथिलीच्या अदाशी संलग्न अशी ती अदा जणू मैथिलीच मलमली तारुण्य आपल्याशी एकरूप होते असं वाटताना ओठांशी येऊन भिडणारे  ते रेशमी ओठ ... आणि मग तो दिसलेला स्वप्नालीचा चेहरा ... का ? का हा खेळ देवा ? का मला सुखांशी नाही सांगड घालता येत ... प्रेमचा देवाला विचारलेला तो निर्मल प्रश्न ... आणि मैथिलीने म्हटलेलं ते लाघवी गीत ... मैथिलीच्या शब्दांचे अनुकंप अजूनही प्रेमच्या डोक्यात मुंग्या आणत होते 

मलमली तारुण्य  माझेDonde viven las historias. Descúbrelo ahora