मलमली तारुण्य माझे - भाग तिन

1.3K 7 1
                                    

कार मॉल रोडच्या हॉस्पिटल मध्ये आली .. स्वरालीला स्ट्रेचर वर टाकून नर्सने आत नेलं आणि तिला सलाईन लावली ... तिला बाजूच्या रूम मध्ये ठेवण्यात आलं होतं .. डॉक्टर प्रेमच्या रूम मध्ये होते त्यांनी नर्सला विचारलं

काय झालं स्वरालीला ?

काही नाही थोडी ग्लानी आहे मी तपासलंय आणि तिला आणि सलाईन लावलीय

प्रेमच्या कानावर ते गेलं आणि तो तडफडून जागा झाला .. काय झालं स्वरालीला ? कशी आहे ती .. आणि तो उठण्याची धडपड करू लागला डॉक्टरने त्याला बसवत म्हटलं

काही नाही .. तुम्ही आराम करा तिला काहीही झालेलं नाही

मग ती नर्स काय म्हणाली ?

काही नाही तुमच्या काळजीने तिने दोन दिवस खाल्लं नाही आहे आणि ती सकाळीच गोल्फकोर्सला गेली ..

गोल्डफकोर्सला एवढ्या दूर .. माझ्या साठी थोड्या क्षीण आवाजात प्रेम बोलला .. कोण आहे मी तिचा ? का करतेय ती माझ्यासाठी एवढं ..

डॉक्टर तिला विचारा तिचे मित्र आले कि नाही ते ...

हो विचारतो

तेवढ्यात नर्सने स्वराली चं स्ट्रेचर प्रेमच्या जवळ आणलं ... तिला आता थोडं बरं वाटत होतं ..

स्वराली ने थोडं कोचम्बून विचारलं .. कोण हि ? तिने फोटो कडे बोट दाखवलं .. तुमची मिसेस का ?

थोडावेळ शांतता पसरली आणि मग

मैथिली .... एक लांब उसासा सोडून प्रेम उत्तरला

कोण मैथिली !!! किती सुंदर आहे ती ...

हो ती रुपगर्विता होती .. एक सुंदर स्वप्न... पहाटे पडलेलं .. एक काचेरी मूर्ती देवाने खूप आवडीने घडवलेली ... तिचा मंजुळ आवाज .. तिचं निख्खळ हसू .. नदीने खळखळाट करत जावं असं .. आणि सुरेल मधाळ आवाज ..

हे बोलतानाच प्रेमच्या डोळ्यातून आसवांच्या धारा लागल्या

मलमली तारुण्य  माझेМесто, где живут истории. Откройте их для себя