हळूहळू तिचा नवरा माझ्याशी जरा जवळीक करायला लागला .. हे घरी नसताना मुद्दाम हुन यायचं .. मला घाणेरडे शब्द बोलायचे .. आणि एकदा तर त्यांनी मला स्पर्श सुद्धा केला ..आणि मग मी चिडली त्यांना एक कानाखाली लगावली आणि घालवून दिलं .. पण त्याचा प्रतिशोध म्हणून त्यांनी ह्यांना माझ्याबद्दल अश्या गोष्टी सांगणं चालू केलं आणि हे सुद्धा माझ्यापेक्षा त्यांच्यावर विश्वास ठेवू लागले .. जर मला कोणी वाईट साईट बोललं जे मी केलंच नाही तर मी ऐकू कशी ? आणि ती रडू लागली .. मी तिला कसंबस समजावलं आणि त्याला ठणकावलं .. कदाचित सुधारेल सर्व काही ... माहित नाही नात्यात अविश्वास येतो कसा पण येतो तो खूप वाईट करून जातो
तो समोर बोलत होती पण माझं लक्ष तिच्या खिडकीतून बाहेर गेलं होतं .. त्यात मला एक प्रतिकृती दिसत होती आणि मी तिकडे ओढल्या जात होतो .. तेवढ्यात त्या घरातली लाईट ऑन झाली आणि मी आश्चर्य चकित झालो .. अरे हि तर तीच .. ओह हो इथेच राहते हि तर .. तिने मला विचारलं .. तुम्ही नवीन आलात का ? मी मात्र हरवलेला होतो .. आणि तेवढ्यात निशाने मला चिमटा काढला
ये काय करतेस ?
मग लक्ष दे ना कोणी बोलतं त्याकडे .. कुठे बघतो आहेस ?
मी हो म्हणालो .. त्यांच्याशी बोललो आणि समाधानाने घरी गेलो .. रात्र झाली होती मी तरीही खिडकीत गेलो तिला बघायला .. मला ती स्पष्ट दिसत होती .. मी तिला बघतच राहिलो आणि तिने एक मिनिटात लाईट बंद केला आणि माझा फुगलेला फुगा फोडला .. मी मात्र झोपण्याचा प्रयत्न करूनही झोप येत नव्हती म्हणून उठून बसलो .. आणि बाहेर पडलो ..
मी बाहेर जाता जाता बाजूच्या एका खोली समोरून जात होतो .. तेवढ्यात मला त्या घरी कुणीतरी जाताना दिसलं मला वाटलं चोर आहे म्हणून मी ओरडणारच तेवढ्यात मला आतून काहीसा वेगळा आवाज आला .. मी म्हटलं बघू दे काय प्रकार आहे तो .. आणि मी खिडकी जवळ गेलो .. तर आतून मला ती आत मध्ये त्या माणसाशी एकट्यात काही तरी बोलताना दिसल्या .. पाहिजे तास स्पष्ट ऐकू येत नव्हतं पण मी एकटीच आणि आणि तू असा येत जाऊ नकोस .. वैगेरे वैगेरे .. खिडकीच्या छिद्रातून जेवढा मी बघू शकत होतो मी बघितलं ...
YOU ARE READING
मलमली तारुण्य माझे
Romanceमलमली तारुण्य माझे,तू पहाटे पांघरावे मोकळ्या केसात माझ्या,तू जीवाला गुंतवावे लागुनि थंडी गुलाबी,शिरशिरी यावी अशी ही राजसा माझ्यात तू अन्मी तुझ्यामाजी भिनावे