मलमली तारुण्य माझे - भाग बारा

188 1 0
                                    

प्रेम सरदेसाई ... आपल्या मुंबईच्या बंगल्यात प्रवेश करत होता ... त्याला प्रत्येक भिंतीवरचं मैथिलीच्या फोटो हसत होता ... त्याने आपल्या बेडरूमचा दरवाजा उघडला आणि चहाचा कप घेऊन बाल्कनीत बसला ... बसल्या बसल्याच गुगल होम ला आदेश दिला .. प्लिज सिंग .. मलमली तारुण्य माझे ...आणि आदेशानुसार गुगल ने मलमली तारुण्य माझे म्हणायला सुरुवात केली ... हातात सुरेश भटांचा एल्गार होता ... आणि तो एका एका गझल मधून जात होता ... मनात काही शब्द दाटून आले 

जीवना वनवास का हा सरत नाही ? 

चंद्र आकाशात आता दिसत नाही 

प्रेमाने आपल्या डायरी मध्ये लिहायचा विचार केला .. प्रेम डायरी शोधायला लागला पण त्याला ती मिळाली नाही.  प्रेमने संपूर्ण बॅग शोधून काढली पण त्याला काही डायरी मिळाली नाही .. डायरीत असलेला मैथिलीच्या फोटो पण नाही मिळाला .. 

प्रेम आठवू लागला कुठे ठेवली असेल मी डायरी ... त्याला काहीही आठवत नव्हतं .. तो बेचैन झाला कारण त्यात त्याचा जीव अडकलेला होता .. त्याने संपूर्ण बॅग पालथी केली पण त्याला काही डायरी मिळत नव्हती .. त्यानेहॉटेल ला फोन केला पण त्यातही त्याच्या हाताला काहीच लागले नाही ... 

आणि त्याच्या ओठांवरून .. शब्द बोलते झाले ..ओह ... स्वराली !!!!! .. शीट !!!! आता हिला कुठे शोधू ? त्याने खूप प्रयत्न केला पण त्याला स्वरालीचं कॉन्टॅक्ट काही मिळाला नाही ... 

हताश होऊन प्रेम आपल्या पेंटिंग रूम मध्ये आला .. एक कॅनव्हास उचलून तो ठेवला .. खूप अपसेट होता तो .. स्वराली चा चेहरा त्याला दिसू लागला आणि तो तास तास जास्त अस्वस्थ होऊ लागला ... त्या अवस्थेत त्याने पेन्सिल उचलली आणि तो कॅनवास वर मैथिलीची तसबीर रेखाटू लागला ... खूप वेळ रेखाटत असताना त्याचा हात शिताफीने फिरत होता ... हाताच्या वळणावर त्याचा पाहिजे तास ताबा होता ..मात्र मनाच्या ? ... कोणास ठाऊक ? प्रेम बेभान होऊन ते चित्र रेखाटत होता ... हळू हळू चित्र पूर्ण झालं आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याने त्या चित्रातील सुंदरेला रंगाने जिवंत करणं चालू केलं ... खूप वेळ तो त्या रांगांमध्ये खेळत होता शेवटी त्या फटकाऱ्याने त्याचे संपूर्ण अंग भरले आणि एक चित्र त्या कॅनव्हास वर जवंत झाले ... खूप थकल्यामुळे प्रेमळ ग्लानी येत होती .. त्याचा शेवटचा ब्रश तसाच अधुरा राहिला आणि तो तिथेच पडला ... त्याच्या पडण्याने झालेल्या आवाजामुळे त्याच्या घरी काम करणारे सर्व धावत आले .. प्रेमला  ग्लानी आली होती ...तो तिथे निचपीत पडला होता.. प्रेमला तास बघून रामुकाका हताश झाले होते आणि त्यांनी सर्वाना उचला रे साहेबाना सांभाळून असा सांगत असताना त्यांचं लक्ष त्या पैंटिंग कडे गेलं आणि ते थोड्यावेळ विचारात पडले ... सर्व जण प्रेमला उचलू लागले होते आणि त्यात एकाच पाय पाण्याच्या भांड्यावर पडला आणि संपूर्ण चित्रावर पाणी उडालं .... तरीही ते चित्र तेवढंच सुंदर होतं .... सर्वानी मिळून त्याला त्याच्या बेडवर नेवून झोपवलं ..मात्र रामुकाका अजूनही मानाने त्या पैंटिंग रूम मध्ये होते ...  

डॉक्टर आले आणि त्यांनी चेक केलं , त्यांच्या मनात काळजीने घर केल होतं .. त्यांनी रामुकाकाला इशारा करत बाहेर नेलं आणि विचारू लागले .. प्रेम सध्या कुठे कुठे गेला .. काय केलं .. खूप ताण  तर नाही घेतला ना ... पण प्रेमाच्या मनाला कोणीच ओळखू शकत नव्हतं ... त्याच्या मनात किती काळजीनं घर केलं होतं कोणीच ओळखू शकत नव्हतं .. डॉक्टरांनी इंजेकशन दिलं आणि ते निघून गेले     

रामुकाकांनी बऱ्याच वर्षांपासून प्रेमची काळजी घेतली होती .. मैथिली गेली आणि प्रेम एकटा झाला .. त्याने त्याच्या कामामध्ये खूप प्रगती केली .. मोठं होत गेला. पण हळू हळू तो स्वतःकडे दुर्लक्ष करून राहिला होता .. त्याला जबरदस्तीने जेवायला नाही लावलं तर तो जेवायचं नाही ...  प्रेमच्या तब्येतीची रामुकाकांना काळजी लागून राहिली होती .. ते सरळ खाली गेले आणि त्यांनी देवाच्या देव्हाऱ्यासमोर हात जोडून नमस्कार केला देवा साहेबाना ठीक ठेव रे .. रामुकाकांच्या डोळ्यातून असंच पाऊस पडायला लागला होता आणि ते तसेच बसून एक एक आठवण काढू लागले होते .. 

मैथिली ... चल आत ये ..आणि नको ते पाणी शिंपडू माझ्या अंगावर .. ये नको त्रास देऊ ना ... अग नको त्या पावसाचा  खेळ ... 

मैथिली गॅलरीत  बिनधास्त भिजत होती ...तिच्या नाचण्याने संपूर्ण गॅलरीतील पाणी बेडरूम मध्ये उडायला लागल होतं ... त्या पाण्यावरून नाचताना  तेवढ्यात तिचा पाय घसरला आणि प्रेम तिच्या मदतीला धावला ...तिला अलगद सपोर्ट देत त्याने तिला पकडून ठेवलं .. थोडं मिठीत सामावून घेतलं .. त्यांच्या प्रेमाची मिठी घट्ट आणि गाढ होती ...  

बघ म्हटलं होतं ना .. पडशील म्हणून एक तर साडी त्यात मुंबईचा पाऊस 

तू आहेस ना मला माहित आहे 

बरं चल मी तुला उचलून नेतो .. आणि प्रेम ने मैथिलीला अलगद उचलून तिला बेरूमच्या दिशेने न्यायला सुरुवात केली ... 

मलमली तारुण्य  माझेOù les histoires vivent. Découvrez maintenant