कॉलेजमधील कॅन्टीन कडे गेलो ... आणि मला ती दिसली ..
लेमन येलो लखनवी कुर्ती .. त्यावर साजेसा पटियाला .. खांद्यावर ओढणी .. रेशीमधाग्याने कलाकुसर केलेली ... छानशी घातलेली वेणी .. सरळ नाक टपोरे डोळे .. मासळीसारखे नव्हते पण .. मनाच्या समुद्रात वादळ निर्माण करेल असे जरूर होते ... गव्हाळ गोरा वर्ण ... लयदार रांगोळीसारखी शरीरयष्टी ,,, गुलाबाच्या पाकळ्यांसारखे ओठ ... आणि थोडे कुरळे केस .. कानात मोत्यांचे टॉप्स .. नाकात नोजपिन .. गळ्यात सोन्याचा एकेरी धागा ...
मी तिला बघताच राहिलो आणि तिच्या दिशेने जाऊ लागलो ... फक्त शंभर पाऊलं दूर असेल तेवढ्यात माझ्या चपलेचा आंगठा तुटला ... म्हणून मी खाली बसलो ... आणि वर बघतो तर कुणी तरी मुलगा तिला प्रोपोज करत होता .. मन तुटलं कि चपलेचा अंगठा .. आजही नाही सांगता येत पण .. मग मात्र .. मी कधीच बायोलॉजि मध्ये मन शोधलं नाही .. .. कारण हळू हळू मला कळून चुकलं होतं कि आईने कितीही सोन्या म्हटलं तरी आपली मूर्ती मातीची आहे .. आपल्या सावळ्या ... ( नाही रे काळ्या) रंगाला प्रेमाच्या जगात पाहिजे तेवढा भाव नाही आणि त्यातल्या त्यात चप्पल घालून येणाऱ्याला व्हिलन पण समजत नाही .. मग माझ्याशी कुणी मुलगी बोलेल कशी ? ...
एस्क्युज मी सर ... आपलं विमान लवकरच उतरेल .. काही हवंय का चहा कॉफी ? ऐरहोस्टेज ने प्रेमला थोडं हलवत उठवलं ..
नाही .. स्वप्नातून बाहेर येत .. प्रेमने तीला सांगताना वर्तमानपत्र घेतलं आणि वाचायला लागला ... .
KAMU SEDANG MEMBACA
मलमली तारुण्य माझे
Romansaमलमली तारुण्य माझे,तू पहाटे पांघरावे मोकळ्या केसात माझ्या,तू जीवाला गुंतवावे लागुनि थंडी गुलाबी,शिरशिरी यावी अशी ही राजसा माझ्यात तू अन्मी तुझ्यामाजी भिनावे