मलमली तारुण्य माझे - भाग सोळा

211 1 0
                                    

त्या सुंदरीने आत धाव घेतली आणि बघते तर आत संपूर्ण धुराने साम्राज्य स्थापलेले होते .. ती कशी तरी आत गेली आणि बघते तर एक व्यक्ती खाली बेशुद्ध पडून होता तिने सर्व ताकत पणाला लावून त्या व्यक्तीला बाहेर ओढण्याचा प्रयत्न करू लागली .. धुरामुळे तिला काही एक दिसत नव्हते .. ती डोळे फाडून बघण्याचा प्रयत्न करत होती ... पण सर्व व्यर्थ होते तिने कसतरी त्या व्यक्तीला दारापर्यंत आणलं आणि तेवढ्यात दारासमोर कारचे करकचून ब्रेक लागले ... निशा घाईघाईत कार मधून उतरली आणि बघते तर समोर एक १७-१८ वर्षाची मुलगी प्रेम ला ओढत आणत आहे .. ती तशीच धावली तिच्या कार मधून तिच्या दोन साथीदार उतरल्या आणि त्यांनी प्रेमला उचलून धरलं .. जसा प्रेम बाहेर आला .. तशी ती मुलगी ओरडली प्रेम तुम्ही !!!!!!!! 

निशा तिच्याकडे लक्षपूर्वक बघायला लागली तिला ती त्या दिवशीच्या फोटोतली मुली सारखी दिसली ... निशाच्या तोंडून शब्द बाहेर पडले .. स्वराली ? 

त्या मुलीने आश्चर्याने बघितले आणि म्हणाली ? आपण 

मी निशा .. निशाने प्रेमला गाडीत ठेवता ठेवता सांगितले .. 

निशा आणि स्वराली प्रेम ला घेऊन दवाखान्यात गेल्या आणि इकडे प्रेमच्या घराचा ताबा घेतला .. संपूर्ण आग विझवली मात्र आग विझवताना संपूर्ण पथक प्रेमच्या घरात फिरत होते ... फिरत असतानाच त्यांच्या पायाला काही वस्तू अडखळल्यात आणि त्यांनी त्या वस्तू उचलून बघितली .. तर त्यात काही इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनन्ट होते .. आणि ते इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनन्ट तेथील एका प्लग ला लावले होते ...त्या टीमच्या मनात शंका उपस्थित झाली आणि तेवढ्यात तिथे सबइन्स्पेक्टर सत्यभामा शिंदे आल्यात ..त्यांच्या सोबत त्यांचे पथक होते .. त्यांनी घराची चौकशी सुरु केली .. अग्निशामक दलाच्या त्या कर्मचाऱ्याने ती वस्तू पोलिसांना देत त्याला कुठे मिळाली पासून सर्विस्तर सांगितलं .. सत्यभामा शिंदेचा करारी चेहरा बघून कुणाच्याही मनाचा थरकाप उडायला वेळ नाही लागायचा .. त्यात त्यांची शोधक नजर ...  

मलमली तारुण्य  माझेOù les histoires vivent. Découvrez maintenant