ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करताना.... राहू व केतू ह्या दोन ग्रहांना " छायाग्रह" असे संबोधले गेले आहे. सात ग्रहांचे सात वार ( सोम,मंगळ, बुध, गुरु,शुक्र,शनी व रवी)आहेत. परंतु, त्यामध्ये राहू व केतूंला स्थान नाही. पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची भ्रमण कक्षा व चंद्राचे पृथ्वीभोवती फिरण्याचे भ्रमण कक्षा ज्या दोन ठिकाणी छेदते, ते दोन छेदनबिंदू म्हणजे 'राहू -केतू 'होय. राहुला सर्पाच्या तोंड व केतूला शेपटी मानलं जातं.
राहूचे मानवी जीवनावरील परिणाम अभ्यासू!
1) राहू हा पितृकारक आहे. त्यामुळे स्वप्नात सतत मृत व्यक्ती येऊन काहीतरी मागणी करत असेल.... तर ते राहू युक्त स्वप्न आहे.
2) सर्पाने दंश केलेल्याची अथवा सर्प स्वप्नामध्ये येत असतील.... तर त्याचा संबंध देखील राहू व केतूशी येतो.
3) एखाद्याच्या वागण्यातील वेडसरपणा, शूद्र विचार यावर राहू चा पगडा असतो.
4) स्वप्नामध्ये मांजर,मासे यांचे होणारे सततचे दर्शन म्हणजे राहू चा प्रभाव होय.
5) पिशाच्च बाधा, अदृश्य छायाचा परिणाम, आक्रस्ताळी वृत्ती, चोरी हे सर्व राहूच्या कक्षात येणारे गुणधर्म आहेत. मी लिहिलेल्या " पूर्व जन्माच्या स्मृतींचा चालू जन्मावर परिणाम होतो का? "..♨️💀💀 एक भयावह अनुभव☠️☠️♨️ मिलिंद नावाच्या पात्राच्या कुंडलीत देखील असेच भयानक योग होते. मिलिंद ला ह्या सर्व घटना घडताना... अष्टमातील राहूची महादशा चालू होती.( सदर लेख "रहस्य पुनर्जन्माचे "... ह्या भागात प्रकाशित केले जाईल!)
6) राहू ही एक प्रवृत्ती आहे. जी प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी जास्त प्रमाणात अस्तित्वात असते. अशा प्रकारच्या प्रवृत्तीला वाव मिळाल्यास.... ती आपले हात पाय पसरू लागते. त्यामुळे राहू नामक प्रवृत्तीला वेळीच आळा घालणे गरजेचे असते.