काही वेळेला ज्योतिषी त्रिपिंडी श्राद्ध करायला सांगतात! बहुतांशी वेळा कालसर्प योग शांती, नारायण+ नाग बली, त्रिपिंडी श्राद्ध हे तिन्ही एकदम अथवा यातील एखादा विधी सुचवला जातो.याबद्दल काही माहिती,आपण गेल्या लेखात पाहिली आहे.
त्रिपिंडी श्राद्ध म्हणजे वंशातील, घराण्यातील ज्या मृतात्म्यांना/ पितराना इष्ट गती प्राप्त झालेली नाही... अतृप्तता आहे.. त्यांना सद्गती प्राप्त करून देण्याचा विधी होय. मृतात्मे / प्रेतयोनी यांचे ...1) पृथ्वीवर वास्तव्यास असणारे तमोगुणी 2) अंतरिक्षात वास्तव्यास असणारे रजोगुणी 3) वायुमंडळात निवास करणारे सत्वगुणी पितरांना गती मिळण्याकरिता हा विधी केला जातो. ह्या तीन लोकात/ स्तरात वास्तव्यास असणाऱ्या पितरांना गती मिळावी... याकरिता पिंडदान केले जाते... म्हणून याला त्रिपिंडी असे संबोधले जाते. श्रद्धेने केले जाते म्हणून श्राद्ध!... त्रिपिंडी श्राद्ध!
काही पिढ्यात ही प्रेत योनीतील पितरं त्रास देतात... त्यांची शांती... म्हणजे तृप्तते करिता हा सगळा खटाटोप असतो. आपल्या गोत्रातील पितरांना सगोत्र व गोत्राबाहेरील प्रेतयोनीला ' अनादिष्ट गोत्र ' म्हटलं जातं.