बळी (?)

5 1 0
                                    

या गोष्टीला बरीच वर्ष होऊन गेली. सदर दांपत्याचा मला फोन आला होता. त्यांचा मुलगा गायब होऊन दीड वर्ष उलटून  गेले होते. आई-वडिलांनी....एका तथाकथित बाबाचे टीव्हीवरील प्रवचन पाहून आपल्या मुलाला त्याच्या आश्रमाच्या शाळेत दाखल केले होते. त्यामुळे सदर मुलगा हा आश्रमाच्या शाळेच्या वस्तीगृहातच राहत असे. मुलाला अध्यात्माचे शिक्षण देखील मिळावे, हा आई-वडिलांचा उदात्त हेतू होता. सदर संत व्यक्तिमत्वाचा मुलाच्या डोक्यावर आशीर्वाद असल्यास, सर्व काही व्यवस्थित होईल.... असा विश्वास,सदर दांपत्याला होता. ह्या संत व्यक्तिमत्त्वाच्या शाळेतील मुलांना वेगवेगळ्या धार्मिक स्थळांना भेटी घडवून आणण्याचे कार्यक्रम एक दोन महिन्यांनी होत असतं. अशाच एका तीर्थक्षेत्राला त्या आश्रमाच्या शाळेच्या माध्यमातून मुलगा तीर्थक्षेत्राला भेट द्यायला गेला असता, तो बेपत्ता झाला.,.. अशी आश्रमाच्या  संबंधित लोकांनी माहिती दिली होती.सदर मुलगा पळून गेल्याचा कांगावा देखील आश्रमाच्या काही लोकांनी केला होता. पोलिसात देखील तक्रार केली गेली होती.
    एवढं सर्व होऊन देखील दाम्पत्याला त्या संत व्यक्तिमत्वाबद्दल अतिशय आदर होता. बाबा त्रिकाल ज्ञानी आहेत,असा त्यांचा समज होता. खरं तर पालकांनी आपल्या मुलाचं काय झालं? हा प्रश्न त्या संत व्यक्तिमत्त्व उर्फ बाबागिरी करणाऱ्या व्यक्तीलाच विचारायला हवा होता! परंतु, तसं झालं नाही.(  माझा बऱ्याच वेळेला हा अनुभव आहे.... मोठमोठे स्वयंघोषित संत यांच्याशी संपर्क सहजपणे साधयला दिला जात नाही. उगाच त्यांना सर्व काही समजत अशा भ्रमामध्ये... त्यांचा शिष्यवर्ग असतो. त्यांच्या शिष्यवर्गाला पडलेले प्रश्न देखील अनेक वेळा मला विचारण्यात आले आहेत.मी गमतीने त्यांना म्हटलं... " तुमच्या गुरूंचा मग उपयोगच काय आहे? तुमच्या साध्या प्रश्नांची उत्तरं किंवा तुमच्या शंकांचे निरसन ते करत नसतील, तर तुम्ही दुसरे गुरु शोधा! उपासनेत आलेले अनुभव त्यामधून निर्माण झालेल्या शंका यांचा निरसन जर  गुरु कडून होत नसेल, तर शिष्य दिशाहीन होऊ शकतो. अशा भोंदू संत व्यक्तींच्या ग्लॅमरला भुलून त्यांना मानणाऱ्या लोकांचा ब्रेन वॉशिंग होणं गरजेचं आहे. असो!)
    विषयांतर झालं....! सदर मुलगा 15 वर्षाचा होता. त्यामुळे तो कुठे हरवणे सहज शक्य नाही? पंधरा वर्षाच्या हल्लीच्या मुलाला चांगली समज असते. त्यात करून तो मुलगा  काही दिवस आधी आपल्या आई-वडिलांबरोबर आपल्या घरी जाऊन आला होता. त्यावेळी घरी आई-वडिलांबरोबर कोणतीही असंतोष जनक घटना अशी काही घडली नव्हती! त्यामुळे कुठे रागाने वगैरे निघून गेला असेल हा भाग देखील यामध्ये येत नाही.सदर मुलाची जन्म कुंडली पाहिली असता..... शंकेची पाल मनात चुकचुकली. मुलाची नकारात्मक महादशा काहीतरी वेगळंच सांगून जात होती. थोडा अभ्यास करता.... बाकीचा कुंडलीचा तपशील मुलाच्या व्यक्तिमत्वाशी  परफेक्ट जुळत होता. मुलाच्या जिवंत असण्याबद्दलच साशंकता निर्माण झाली होती. परंतु कुंडली हा भाग फक्त शक्यता वर्तवतो!... सदर मुलगा 16 वर्ष झाली तरी पुन्हा परतलेला नाही. आई-वडिलांना अजूनही तो येण्याची आशा वाटते. त्या आशेवर आई-वडील जगत आहेत. सदर मुलाच्या छायाचित्रानी ( photos )घराच्या भिंती सजल्या आहेत. " आठवणींवर जगणे " हा एकच भाग या एकुलत्या एक मुलाच्या  पालकांवर ओढावला.
     त्यानंतर काही व्यक्तींकडून त्या आश्रमातील अनेक मुलं अशा पद्धतीने गायब झाल्याची बातमी मिळाली. बाबाची पोहोच अनेक राजकारणांपर्यंत असल्याने त्यावेळेस त्यावर काही कारवाई झाली नाही. परंतु सदर बाबा आता मात्र जेलमध्ये आहे. सदर बाबाच्या आश्रमातील काही भागांमध्ये नरबळी दिल्याचे प्रकारांबद्दल बातम्या आल्या.... परंतु पुरावे नष्ट झाल्याने... त्याबद्दल पुढे काही झाले नाही. जो व्यक्ती अशा बातम्या फोडतो त्यांना धमकावण्यात आले. जो व्यक्ती आपले श्रद्धास्थान बनतो.... तोच व्हिलन ठरला.... तर येणारी  असहायता  फार विचित्र असते.
      माझं एकच सांगणं आहे.... कुठच्याही व्यक्तीला आदरस्थान/ श्रद्धास्थान  देण्यापेक्षा.... प्रत्येक गोष्टीची शहानिशा स्वतः करून घ्या! चमत्कार काही वेळाच घडतात! सतत घडत नाहीत! आता अशा प्रकारचे गुरु उरले नाहीत जे तुमच्या पूर्ण आयुष्याची जबाबदारी घेतील! त्यामुळे कृपया अशा भ्रमात राहू नका! अनादी काळापासून चे तत्व विराजमान आहे.. त्याचीच उपासना करा!
   

🔆🔆गूढ ज्योतिषशास्त्राचे 🔆🔆Where stories live. Discover now