🔥🔥मंगळ ग्रह - रहस्य 💥💥

5 1 0
                                    

ज्योतिष शास्त्रामध्ये मंगळ या ग्रहाविषयी सतत एक भीती निर्माण केली गेली आहे.1,4,7,8 व 12 ह्या कुंडलीतील भावांमध्ये मंगळ ग्रह असल्यास ते त्या विशिष्ट व्यक्तीला मंगळ ग्रहाचा त्रास आहे किंवा मंगळी पत्रिका आहे असं बोललं जातं. मंगळाचा  संबंध अग्नी तत्वाशी येतो. मंगळाचा संबंध हा नऊ (9)या अंकाची येतो. मंगळा शुभकारक व अशुभकारक दोन्ही प्रकारची फळ देण्यास समर्थ आहे. मंगळ नकारात्मक असल्यास  भाजणे, अपघात, खरचटणे, भांडण तंटा, अतिशय राग येणे, रक्तदाब वाढणे वगैरे  भावनांच्या उद्रेकाचे परिणाम त्या व्यक्तीवर विशेषतः दिसून येतात. मंगळ हा भूमी तत्वाचा कारक आहे. आता काही विशेष महत्त्वाचे मुद्दे मंगळ ग्रहlसंबंधित अभ्यासू!
1) मंगळ हा आपल्या  मुलाधार चक्राशी संबंधित आहे.
2) मुलाधार चक्र हे आपल्या सूक्ष्म देहामध्ये ( astral body ) मेरुदंडाच्या खालच्या टोकाला सूक्ष्म अवस्थेत आपलं अस्तित्व राखून असतं.
3) आपल्या शरीरातील सप्तचक्रांमध्ये वेगवेगळ्या भावनांचा निवास असतो. त्यातील मुलाधार चक्रामुळे.... आपल्याला स्व अस्तित्वाची जाणीव सतत राहते. मुलाधार चक्रामुळेच ह्या जगामध्ये आपल्याला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व प्राप्त होत असते.... ते राखून ठेवण्यास मुलाधार चक्र तुम्हाला सतत मदत करत असते.
4) मानव ज्यावेळी जन्मास येतो त्यावेळी.... त्याचं नामकरण केलं जातं. त्याला एक ओळख म्हणजेच (identity )आयडेंटिटी दिली जाते. या कारणाने त्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव सतत राहते. मानवाचे स्वतःच स्वतंत्र अस्तित्व... राखण्याची प्रेरणा मुलाधार चक्रातून येत असते.
5) मुलाधार चक्राचे स्वामी श्री गणेश हे दैवता कडे आहे. हे बाकीचे लेख वाचल्यास तुमच्या लक्षात येईल श्री गणेश व श्री कुलदेवता ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मुळ + आधार  ( मुळा धार )चक्रामध्ये श्री गणेशासह श्री कुलदेवी आपली जागा राखून असते.
6) अगोदरच्या काळी ज्या वेळेला तंत्रविद्येचे प्रयोग केले जात.... त्यावेळेला त्या व्यक्तीवर प्रयोग करताना त्याच्या अस्तित्वावर घाला घालण्यात येई... अशा तंत्राचा वापर केला जात असे. त्यामुळे प्रथमतः नकारात्मक शक्ती ही व्यक्तीच्या मुलाधार चक्रावर आघात करण्याचा प्रयत्न करत असे. एकदा का मुलाधार चक्र अस्थिर अथवा कमकुवत झाले... की त्या व्यक्तीला त्रास देणे सोपे होत असे. ह्या आधीच्या लेखातही मी सांगितलं आहे.... मुलाधार चक्र हा पाया आहे. आणि एखाद्या इमारतीचा पाया जर कमकुवत असला तर इमारत कोसळायला वेळ लागणार नाही. त्याप्रमाणे मुलाधार चक्र कमकुवत झाल्यास ती व्यक्ती आपलं धैर्य व आत्मविश्वास गमावून बसते.
    इथे एक भाग लक्षात घ्या प्रत्येक वेळेला काही तांत्रिक प्रयोगच.... मुलाधार चक्राला कमकुवत करतात असं नाही. स्वतःबद्दलच्या सततच्या नकारात्मक विचाराने देखील.... मुलाधार चक्र कमकुवत बनत जाते. बरोबर इतर आणि केलेली आपली अवहेलना, कमीपणा... चे विचार अथवा विचारांची स्पंदनग्रहण केल्यास.. देखील मुलाधार चक्रावर नकारात्मक परिणाम होतो.
     ह्याच करिता मंगळावर प्रभावशाली उपाय म्हणून श्री गणेश व कुलदैवत या दैवतांची उपासना केली जाते. कुलदेवीची स्थापना करण्यामागील उद्देश असा आहे की, जी काही नकारात्मकता व्यक्तीवर अथवा कुटुंबावर प्रक्षेपित केले जात असेल.... ती नकारात्मक शक्ती प्रथमता कुलदेवी स्वतःच्या अंगावर घेते. त्यामुळे घरामध्ये कुलदेवी स्वरूपात कलशाची स्थापना केलेली असल्यास... अचानक कुलदेवीच्या  श्रीफळाला  तडा जाणे.... वगैरे प्रकार घडलेले मी स्वतः पाहिले आहे. काही वेळा तर.... नकारात्मक स्वप्न पडून.... त्यानंतर त्याचे प्रत्यक्षत: पडसाद.... श्री कुलदेवीच्या नारळावर झालेले दिसून आलेले आहेत. अर्थात ज्यांची श्रद्धा आणि विश्वास आहे त्याबाबतीतच असे घडताना दिसून येते. श्रद्धा आणि अंधश्रद्धा या गोष्टींमध्ये आंदोलित होणाऱ्या .....तळ्यात- मळ्यात करणाऱ्या व्यक्तींना काही साध्य होताना दिसत नाही.
     याकरिता मंगळ ग्रहाचा नकारात्मक प्रभाव दूर करण्यासाठी.... श्री गणेश व श्री कुलदेवीची उपासना प्रामुख्याने केली जाते. मंगळाचे शुभ / अशुभ  परिणाम आहेत. त्याचप्रमाणे श्री गणेश हे विघ्नविनाशक/ विघ्नहर्ता याचबरोबर  विघ्नकर्ता म्हणून देखील कार्य करत असतो. ह्या सर्व अभ्यास करण्याच्या गोष्टी आहेत... इथे भावनांना विशेष स्थान नाही. भावनांचा अतिरेक टाळलेला बरा! तत्त्वांचा सांगोपांग अभ्यास करण्याकरिता.... स्वा अनुभवच महत्त्वाचा ठरतो. पूर्वग्रह दूषित भावनेने एखाद्या तत्वाचा अभ्यासातून  योग्य ते उत्तर साधकाला सापडणार नाही.
    मी लिहीत असताना थोडक्यात विषय विशद करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक दैवतांची वेगवेगळी कार्य असतात. ती समजून घेऊन हिंदू धर्मामध्ये विविध दैवतांची उपासना सुचवली  जाते. एखाद्या रोगावर एकच गोळी काम करत नाही.. रोगाचे स्वरूप समजून घेऊन त्यानुसार वेगवेगळे उपचार करणं आवश्यक असतं.
    मी पुन्हा एकदा सांगतो हे विषय भरपूर... क्लिष्ट असल्याने... त्यात परस्पर विरोधी मतांतर असल्याने.... बुद्धिभेद होऊ शकतो. त्यामुळे स्वा-नुभवावरच साधक पुढे जाऊ शकतो. काही वेळेला आजोबा एखादी रूढ अथवा परंपरा पाळतात, म्हणून वडील त्या गोष्टींचं अंधानूकरण करतात.... वडील करतात म्हणून त्याचा मुलगा देखील.... तसंच कॉपी करण्याचा प्रयत्न करतो. अंध अनुकरण करण्यापेक्षा स्व -अनुभव घ्या.🙏🙏🙏

You've reached the end of published parts.

⏰ Last updated: Nov 24, 2023 ⏰

Add this story to your Library to get notified about new parts!

🔆🔆गूढ ज्योतिषशास्त्राचे 🔆🔆Where stories live. Discover now