शुक्र -" मिठा जहर "🔥

6 1 0
                                    

शुक्र हा सौंदर्याचा कारक, प्रेमाचा कारक, कलासक्त, आकर्षण, ऐहिक सुख, विलास, चैन, आसक्ती व वासना यांचा कारक आहे.
      कला व सौंदर्याचा कारक म्हणून कलाकार, नट - नट्या, गायक, वादक, चित्रकार, छायाचित्रण  ( फोटोग्राफी ), मेकअप मन, डेकोरेटर्स असे अनेक भाग शुक्राच्या अधिपत्त्याखाली येतात.
       शुक्र ग्रह हा जलतत्त्वाचा कारक आहे. शुक्र ग्रहाचा संबंध  स्वाधीष्ठान चक्राशी येतो. हे चक्र बेंबीच्या खाली तीन बोट आहे. स्वाधिष्ठान चक्र( sacral chakra )सूक्ष्म देहामध्ये ( astral body )अस्तित्वात असते. स्वाधिष्ठान चक्राचा संबंध सुख संवेदना ( worldly pleasure )यांच्याशी येतो. मूलभूत गरजा पूर्ण झाल्यावर बहुतांशी माणसांचा कल हा अधिकाधिक सुख प्राप्त करण्याकडे जातो. शुक्राच्या अधिपत्याखाली असणारी व्यक्ती महागड्या, ब्रँडेड, आरामदायी, चार चौघांचे  लक्ष वेधून घेणाऱ्या... थोडक्यात ग्लॅमरस (glamourous), सर्व सुविधांनी युक्त (luxerious ) जीवनशैलीकडे धाव घेताना दिसून येते. ह्याच कारणाने  एखाद्या व्यक्तीची "जाणीव" ही स्वाधीष्ठान चक्रामध्ये अडकली असल्यास त्याचा सर्व कल हा भौतिक सुखांकडे वळतो. स्वाधिष्ठान चक्रामध्ये जाणीव अडकलेला व्यक्ती प्रेमापेक्षा( love )वासनेला( lust )महत्त्व जास्त देतो.... किंबहुना तो वासनेलाच प्रेम समजत असतो.
       याउलट छातीच्या मध्यभागी असणारे अनाहत चक्र ( heart chakra ) हे प्रेम,दया,करुणा भावांचे अविष्कार करत असते.निखळ, फारशी अपेक्षा न धरणारं, व्यवहारिक भागाला फारसं महत्त्व न देता प्रेमाचा भाग  हा अनाहत चक्राशी निगडित असतो. अनाहत चक्र हे देखील सूक्ष्म देहामध्ये ( astral body )अस्तित्वात असते.
     सध्याच्या युगामध्ये अशा प्रकारच्या अनाहत चक्राच्या अविष्काराच्या प्रेमाची कमतरता भासते. लग्न संस्था ( marriage instutution) हा सर्व अर्थ कारणाचा भाग पाहून केला जातो. त्याच बरोबर भावनांना स्थान कमी व सौंदर्याला स्थान जास्त आहे.  लग्न करताना 1)नोकरी चांगली आहे का? 2) सौंदर्य 3) घराणं, जात-पात याचा प्रथमतः विचार केला जातो. त्यामुळे शुक्राचा प्रभाव ज्यावेळी अनाहत चक्रावर असतो... त्यावेळी प्रेमाचा खरा आविष्कार दिसून येतो.मात्र, शुक्राचा स्वाधिष्ठान चक्रावरील प्रभाव हा वासनेला, शारीरिक सुखाला जास्त बळ देतो. या अनाहत चक्र व स्वाधिष्ठान चक्राचा तुलनात्मक दृष्ट्या अभ्यास केल्यास सध्याच्या युगामध्ये स्वाधिष्ठान चक्राचा प्रभाव पाहायला मिळतो. शुक्राची वासना, आसक्तीची बाजू प्रबळ ठरते.
        सर्व जगात पाहिल्यास  99% प्रभाव शुक्राचाच दिसून येईल. इथे खरं प्रेम मिळताना फार मुश्कील आहे. सर्व काही व्यवहाराचा भाग दिसून येतो.
    सिने जगतातील नट नट्यांचे पाहिलं तर... शुक्राचा पूर्णतः प्रभाव असल्यामुळे.... त्यांच्या जीवनामध्ये असणाऱ्या घडामोडी, प्रेम प्रकरण.... त्यामुळे सगळा गोंधळात गोंधळ दिसून येतो. त्या ठिकाणी पैसा आहे पण सुख शांती नाही. शुक्र हा  अनैतिकते कडे वळवणारा मार्ग सुचवतो. शुक्र हा  नवीन नवीन सुख शोधण्याच्या क्लुप्त्या मानवाला पुरवत राहतो. भोगाला अंत नाही, हेच खर!
     शुक्र प्रेमाचा कारक असला तरी.... प्रेम आणि वासना...
थोडक्यात अनाहत चक्र व स्वाधिष्ठान चक्र... यामध्ये गफलत निर्माण करून एक प्रकारचं "मायाजाल" निर्माण करतो." पूर्वजांच्या स्मृतींचा चालू जीवनावर परिणाम होतो का? " मी लिहिलेल्या   मालिकेतील " निशा" हे व्यक्तिमत्व  अशाच प्रेमाच्या शोधात निघून वासनेमध्ये गुरफटतं. निशाच्या व्ययस्थानातील शुक्र तिला वासने कडे वळायला प्रवृत्त करतो. निशाच्या अष्टमातल्या नेपच्यून मुळे तिचा झोपेच्या गोळ्या घेऊन मृत्यू झाला . "निशा" ही एक कहानी नसून ती एक भीषण सत्यता आहे.
     शुक्र ची एक मायावी फसवी दुनिया आहे. शुक्राचा प्रभाव असल्याला भाग सर्व दिसताना.... प्रलोभनकारी, सुखमय... दिसला तरी.... त्यात अनेक खाचखळगे आहे. प्रेमाच्या नशेत धुंद होऊन  अनेक चुका करणारे, स्वतःचा आयुष्य बरबाद करणारे, व्यसनाच्या आणि वासनेच्या आहारी जाणारे, चुकीचा मार्ग धरणारे  भरपूर जण आपल्या आजूबाजूला दिसून येतील.
   शुक्र  बऱ्याच वेळेला  वरून sugar- coated दिसला तरी... त्याच्या अंतरंगामध्ये  " विषाचा " अंशदेखील सापडून येईल. शुक्र हा "दैत्यांचा  गुरु" आहे, हे विसरून चालणार नाही  . शुक्र हा मानवाला अनेक पर्याय / ऑप्शन देतो..... त्यामुळे मानव एका जागी स्थिर राहत नाही.... एकनिष्ठ राहत नाही!..... असो शुक्राचं एक नकारात्मक अंग  व दुसरं सकारात्मक अंग देखील आहे. ह्याच कारणाने शुक्राच्या प्रभावाखालील व्यक्तीने आपली बुद्धी सतत स्थिर ठेवायला हवी.... भावनांवर ताबा ठेवायला हवा.
      शुक्राचा थोडासा भाग इथे देण्याचा प्रयत्न केला आहे. शब्दशः अर्थ घेऊ नये. शुक्राची वेगवेगळे अंग जाणून न घेतल्यास.... मानवाची फसवणूक होऊन... शुक्र हा त्याकरिता  " मिठा जहर" बनू शकतो.
     शुक्र -राहू, शुक्र नेपच्यून बऱ्याच वेळेला चित्र विचित्र फळ देण्यास सक्षम असतात. शुक्र हा जलकारक असून देखील ह्या पाण्यात पोहण्यापेक्षा 'वाहत' जाणारे जास्त दिसून येतात.... असो!
  असं असलं तरी देखील.... शुक्राची सकारात्मक बाजू आहे. शुक्र हा विवाह सौख्याचा कारक आहे. सिनेमा नाटके, चित्रे, रमणीय  नैसर्गिक स्थळे, घाणेन्द्रियांना सुख देणारी सुगंधी अत्तरे, सौंदर्यप्रसाधनं.... हा सगळा भाग शुक्राच्या कार्यशात्वाखाली येतो. शुक्राचं अस्तित्व नसल्यास, या सर्व दुनियेमध्ये एक प्रकारची रुक्षता येईल. शुक्राचं वलय एखाद्याला प्राप्त झाल्यास... सर्वसामान्य व्यक्ती देखील  ग्लॅमरस भासू लागतो.... हाच शुक्राचा चमत्कार आहे. हा समजून घ्यायचा विषय आहे,... शब्दांचा खेळ नव्हे! पुढे कधीतरी ह्या संबंधित आणखी माहिती घेऊ... 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺🌺

🔆🔆गूढ ज्योतिषशास्त्राचे 🔆🔆Donde viven las historias. Descúbrelo ahora