नवग्रहांची नवरत्न उपलब्ध आहेत. माणिक (रवी ),मोती (चंद्र), पोवळे( मंगळ ),पाचू (बुध ),पुष्कराज (गुरु), हिरा (शुक्र ),नीलम (शनी ),गोमेद (राहू), लसण्या (केतू) ही नवग्रहांची नवरत्न होय.
रत्नांचा संबंध रंगाशी जोडला जातो. मुख्य रंग हे सात प्रकारचे आहे. त्याचप्रमाणे मूळ ग्रह सात आहेत. राहू व केतू हे छेदनबिंदू होय. हे आपण मागील लेखात पाहिले आहे. आपल्या शरीरामध्ये देखील सात चक्र आहे. प्रत्येक चक्रांच्या(energy centre)निगडित मानवी भावना ( emotion )असतात.
आपल्या शरीरामध्ये एखाद्या वेळेला विटामिन कमी असल्यास... त्या विटामिन ची ( जीवनसत्वाची ) गोळी डॉक्टर आपल्याला देत असतात. त्यामुळे त्या विशिष्ट विटामिन ची कमतरता भरून निघेल, व आपलं स्वास्थ ठीक होईल... हा त्या मागील कार्यकारण भाव असतो.
आपलं चंद्रबळ कमी झालं की आपल्याला मानसिक त्रास व्हायला सुरुवात होते. छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मनाला लागून मानसिक खच्चीकरण सुरू होते. चंद्रबल कमी झालेला व्यक्ती मानसिक दृष्ट्या कमकुवत होत असतो. याकरिता मोती हे रत्न वापरून चंद्र बळ वाढविण्याचा प्रयत्न केला जातो.
बऱ्याच वेळेलाही रत्न टॉनिक प्रमाणे काम करतात. इन्फेक्शन झालेले असल्यास ते टॉनिक काम करणार नाही. त्याला प्रथमतः अँटिबायोटिक्स द्यावे लागते. थोडक्यात त्याचा मूळ रोग बरा करावा लागेल. त्याचप्रमाणे रत्न हे प्रत्येक ठिकाणी काम करताना दिसून येत नाही. त्याचप्रमाणे त्याच्या विश्वासार्हतेबद्दलचा अनेक प्रश्न असतात. रत्नांची गुणवत्ता व स्तर याबद्दल अनेक मत मतांतर असतात. बराच वेळा अष्टम अथवा व्ययस्थानाशी संबंधित असलेल्या ग्रहाचं रत्न दिल्यास त्याचे विपरीत परिणाम देखील जाणवतात. त्यामुळे माझ्या मते रत्न- उपरत्ने वापरण्यापेक्षा कधीही साधना उपासना अधिक उच्चतम ठरते.
रत्नांमध्ये ब्रह्मांडातील विशिष्ट ऊर्जा खेचून घेण्याची क्षमता असते... असं मानलं जातं. रत्नही वेगवेगळ्या रंगाचे असतात, हे तुम्हाला माहीतच आहे. त्यामुळे आपल्या सूक्ष्म देहातील कमी होणारी विशिष्ट रंगांची कमतरता भरून काढण्या साठी... देखील या रत्नांचा वापर होतो असं समजलं जातं. ब्रम्हांडातील लहरी ऊर्जा खेचून घेऊन ती शरीरामध्ये पोहोचवण्याचे कार्य रत्न करतात, असा समज आहे.