प्रत्येक प्रकारच्या पुस्तकांचा /विषयाचा एक वाचक वर्ग असतो... त्या व्यक्तीवर विशिष्ट ग्रह प्रभाव टाकत असतात. अर्थातच हे प्रभाव सतत बदलत असतात. त्यामुळे कालांतराने त्याच्या आवडीनिवडीवर त्याचा परिणाम जाणवू लागतो. थोडक्यात... ग्रहांचा आपल्या वाचनाच्या आवडीवर असणारा परिणामांचा भाग अभ्यासू! अर्थात यामध्ये मत मतांतर असू शकतात....!
1) गुरु ग्रहाचा प्रभाव असलेली व्यक्तिमत्व:- हे सतत धार्मिक ग्रंथ.... उदाहरणार्थ.. पुराणे, व्रतवैकल्य, वेद, मंत्र, उपासना, प्रासादिक ग्रंथ यांचं वाचन करताना आढळून येते. एखादं पुस्तकाचं एक्झिबिशन लागलेलं असल्यास... त्यांची पावलं धार्मिक ग्रंथांकडे वळतात. गुरु ग्रहाचा प्रभाव असलेले व्यक्तिमत्व... संतांचे आत्मचरित्र अभ्यासताना आढळून येतात.किर्तन ऐकण्याचे आवड देखील गुरु ग्रहाच्या अधिपत्याखाली येऊ शकते.
2) नेपच्यून ग्रहाचा प्रभाव असलेले व्यक्तिमत्व:-हे गुढ गोष्टींचा अभ्यास करताना आढळून येतात. सर्वसामान्यतः गूढ कथा, रहस्य कथा यांचं वाचन करताना... नेपच्यून चा प्रभाव आपल्याला दिसून येतो. संमोहन विद्येचा अभ्यास करणाऱ्यांवर विशेषतः नेपच्यून ग्रहाचा प्रभाव असतोच! त्याचबरोबर परग्रहावरील जीवन, परग्रहवासी ( aliens ), उडत्या तबकड्या(ufo -un-identifying flying objects), बर्मुडा ट्रँगल, शेरलॉक होम्स, नॉस्ट्राडेमस भविष्यवाणी, एरिया 51 वगैरे .. यासंबंधीच्या वाचनामध्ये रुची बाळगणारे नेपच्यूनच्या प्रभावाखाली आढळून येतात. नेपच्यून हा व्यक्तीला गूढतेची आवड देतो. थोडक्यात अज्ञाताची आवड म्हणजे नेपच्यूनचा प्रभाव होय.
विषयांतर म्हणून सांगतो.... पूर्वीच्या काळी आलेले सिनेमे.. उदाहरणार्थ... गुमनाम( मनोज कुमार ), तिसरी मंजिल( शम्मी कपूर), मधुमती( दिलीप कुमार -वैजयंतीमाला ), कोहरा ( विश्वजीत - वहिदा रहमान ), वो कौन थी, मेरा साया ( साधना).... नेपच्यूनच्या प्रभावाखाली असलेल्या फिल्म होय. एक प्रकारची गूढता व त्यातून निर्माण झालेली उत्सुकता... नेपच्यून ची किमया दाखवून देतो. नेपच्यून हा एक अनामिक आकर्षणाचा भाग आहे.असो!
तंत्र मंत्र याचा देखील भाग नेपच्यून प्रभावाखाली येत असतो. परंतु नुसती त्या विषयांमध्ये रुची बाळगणे व प्रत्यक्षत: अनुभव घेणे... यामध्ये जमीन- आसमानाचा फरक आहे.