राघव ला माझी सगळी कहानी मी सांगीतली होती. या आधी जे काही माझ्या सोबत घडले. माझ्या आयुष्याचे संपुर्ण पुस्तक राघव च्या समोर उघडे पडले होते. मी एका कोपऱ्यात शांत उभी राहुन राघव च्या प्रतिक्रिया ची वाट बघत होती. राघव काही वेळ शांत बसला होता. इतका मोठा धक्का पचवण्या साठी त्याला एकांत आणि काही वेळा ची गरज होती. स्वतः ला सावरत राघव आपल्या जागा वरुन उठला आणि माझ्या समोर आला. मला परत एकदा त्यांने प्रेमाने आपल्या मिठी मध्ये घेतला. राघव च्या डोळ्यात माझ्या विषयी अजुन हि प्रेम आणि आदर दिसुन येत होता. एक दिर्घ श्वास घेत राघव मला बोलला.
" जे काही झाले, त्यात नक्की पप्पांची आणि तुझी काही मजबुरी असावी. त्या शिवाय तुम्ही दोघे इतके मोठ पाऊल उचलणार नाही. या वरती माझा विश्वास आहे. झाले गेलं गंगा ला मिळाले... मला तुझ्या भुतकाळ शी काही लेण देण नाही आहे. मला आता या क्षणी खरं सांग, तुला आपले पुढचे आयुष्य माझ्या सोबत घालवु इच्छित आहे की नाही... बाकी तुझ्या साठी मी या समाज आणि जगा सोबत लढु शकतो आणि तुला नेहमी आनंदी ठेवीन याचे वचन हि देत आहे... " राघव च्या बोलण्यात आत्मविश्वास दिसुन येत होता. माझ्या सोबत खर तो प्रेम करत होता.
राहुन राहुन माझ्या मनात फक्त एकच विचार येत होता. तो म्हणजे इंन्द्रजीत यांच्या विषयी... या नवीन संबंधाना त्यांचा विरोध नक्की असणार होता. एक प्रकारे त्यांनी देखील समाजाच्या समोर नाही. पण पत्नी चा दर्जा दिला होता. राघव इतके ते देखील माझ्या वरती प्रेम करत होते. पण राघव मला सर्व समाजा समोर स्विकार करत होता आणि इंन्द्रजीत ह्यांना मला समाजा समोर स्विकाराची लाज वाटत होती. पण जरी मी राघव ला होकार दिला असता. तरी ज्या स्त्री सोबत आपले लैंगिक संबंध बनले आहे. अशा स्त्री ला कोणता पुरुष स्वतः ची सुन म्हणुन स्विकार करु शकत होता.
YOU ARE READING
सावळं सौदर्य
Romanceशालिनी नावाच्या एका सावळ्या रंगाच्या तरुणी ची हि कथा आहे. तिच्या आयुष्य मध्ये बनलेला अनेक पुरुषा सोबत चे लैंगिक संबंध, तिच्या खाजगी आयुष्य मध्ये कसे बदल घडवतात आणि शेवटी तिला तिच्या आयुष्य मध्ये खरे प्रेम मिळत की नाही हे सांगणारी एक हृदयस्पर्शी कथा...