इंन्द्रजीत यांच्या परवानगी नंतर गौरी आमच्या सोबत राहु लागली होती. इंन्द्रजीत जरी जगा समोर आनंदी राहण्याचे दिखावा करत असले. तरी त्यांच्या मनाची अवस्था राघव आणि मला माहीत होती. अशा परिस्थितीत त्यांना एकाकी सोडुन जाण्याची आमच्या दोघांची इच्छा होत नव्हती. पण इंन्द्रजीत यांनी या साठी अट्टाहास घेतला होता. राघव पासुन लांब राहण्याची त्यांची हि इच्छा नव्हती. पण आमच्या दोघांमधील झालेल्या आठवणी विसरण्या साठी हे करणे त्यांना गरजे चे वाटत होते. म्हणुन त्यांना मला आपल्या पासुन लांब करायचे होते. त्या आठवणी चा विसर पडावा. या साठी त्यांचा हा सर्व अट्टाहास होता.
राघव ने या साठी इंन्द्रजीत यांच्या कडे काही दिवस चा वेळ मांगितला होता. इंन्द्रजीत हे देखील राघव शिवाय राहु शकत नव्हते. म्हणुन त्यांनी हि गोष्ट मान्य केली. गौरी आमच्या मध्ये आपला भुतकाळ आणि दुख विसरून एकरुप झाली होती. आमच्या कडुन मिळालेल्या प्रेमाने तिच्या वाईट आठवणी वरती मलम चे काम केले आणि ती पुर्वी सारखी आनंदी राहु लागली होती. गौरी जवळ असल्याने, मला कोणी आपले जवळ असल्या सारखे वाटुन मनाला शांती मिळत होती. पण मला तिच्या भविष्य ची काळजी वाटत होती.
इंन्द्रजीत सुध्दा हळुहळु गौरी च्या मुली सोबत राहुन आनंदी राहायला लागले होते. जणु त्यांना हि गौरी च्या मुली च्या रुपात आपल्या दुखावरती मलम मिळाले होते. इंन्द्रजीत गौरी च्या मुली वरती स्वतः च्या मुली प्रमाणे प्रेम करत होते. त्यांना आनंदी पाहुन राघव ची चिंता मिटली होती. राघव आणि मी आता त्यांना सोडुन लंडन ला जाऊ शकत होतो. पण इंन्द्रजीत यांनी आपला अट्टाहास सोडला होता. त्यांनी आम्हाला त्यांच्या सोबत राहण्याची विनंती केली होती. राघव आणि मी हे ऐकुन खुपच आनंदी झालो होतो. हसत खेळत आम्ही आपले आयुष्य सुखाने जगु लागलो होतो.
YOU ARE READING
सावळं सौदर्य
Romanceशालिनी नावाच्या एका सावळ्या रंगाच्या तरुणी ची हि कथा आहे. तिच्या आयुष्य मध्ये बनलेला अनेक पुरुषा सोबत चे लैंगिक संबंध, तिच्या खाजगी आयुष्य मध्ये कसे बदल घडवतात आणि शेवटी तिला तिच्या आयुष्य मध्ये खरे प्रेम मिळत की नाही हे सांगणारी एक हृदयस्पर्शी कथा...