भाग 6

309 4 0
                                    

''जॉर्डन, गृहमंत्र्यांच्या आॅफिसमधून फोन आलाय.'' डॉ.मार्को म्हणतो.

''गृहमंत्र्यांच्या आॅफिसमधून फोन?'' जॉर्डन आश्चर्याने विचारतो.

''हो. लगेच घे नाहितर कट होईल.'' डॉ.मार्को जॉर्डनच्या हातात मोबाईल देतो.

''हॅलो...'' जॉर्डन म्हणतो.

''आपण जॉर्डन बोलत आहात?'' मोबाईलवर समोरुन दुसरी व्यक्ती बोलते.

''हो...'' जॉर्डन

''मी गृहमंत्र्यांच्या आॅफिसमधून गुप्ता बोलतोय.''

''हो... ओळखलं मी... मोहिमेवर येत असताना माझं आपल्याशी एकदा बोलणं झालं होतं...''

''अगदी बरोबर ओळखलंत... कृपया आपण सांगू शकाल, आपण सध्या कुठे आहात आणि आपल्यासह आपले साथीदार सुखरुप असतील अशी आशा करतो.''

''आम्ही ८६ रोडजवळ आहोत आणि सर्वजण सुखरूप आहोत. काही झालं का?''

''हिमालयामध्ये ३.४ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली असून अनेक गावं जमिनीखाली गाडली गेली आहेत. मोकळ्याा मैदानामध्ये सुरक्षित ठिकाणी उभे रहा. लष्कराचे हेलिकॉप्टर आपल्याला घ्यायला येतच असेल.''

''३.४ रिश्टर स्केलचा भुकंप? पण आम्ही सर्वजण इथे सुखरुप आहोत.''

''नक्कीच ही आमच्यासाठी दिलासा देण्यासारखी गोष्ट आहे, पण आम्ही आपल्याबाबत कोणताही धोका पत्करु शकत नाही.''

''कळतंय मला, पण आम्ही मोहीम अर्ध्यावर सोडून जाऊ शकत नाही. रेल्वे सुरु करण्याआधी या मार्गावर काही अडचणी आहेत त्याची आम्ही चाचपणी करत आहोत. भूकंप ही आमच्यासाठी सामान्य गोष्ट आहे.''

''आपल्याला सांगायला वाईट वाटत आहे, पण आता त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची रेल्वे सेवा सुरु होणार नाही. भुकंपाची माहिती मिळताच दोन्ही देशांच्या परराष्ट्र आणि रेल्वे मंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. आपल्याला सुरक्षितपणे दिल्ली येथे आणलं जाईल. आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे.'' एवढं बोलून गुप्ता फोन ठेवतात.

अग्निपुत्रWhere stories live. Discover now