भाग 19

141 4 0
                                    

रुद्रस्वामींचे शब्द प्रत्येकाच्या कानात घोंगावत असतात. विशेष करुन डॉ.अभिजीतच्या, कारण या सर्व घडामोडींचा शेवट त्याला करावयाचा असतो. सगळे शांतपणे त्या गुहेतून बाहेर येतात.

"सर तुम्ही काय विचार केला आहे?" एक सैनिक शांततेचा भंग करत डॉ.अभिजीतला विचारतो.

"मी अजून काही विचार केला नाहीये." डॉ.अभिजीत म्हणतो.

"पण संपुर्ण जगाला तुम्हीच वाचवू शकता... मनात आणलं तर..." तो सैनिक पुढे म्हणतो.

"मी तुझ्या भावना समजू शकतो. त्या अग्निपुत्राचा शेवट करायलाच हवा. मग त्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल." डॉ.अभिजीतचे हे शब्द ऐकून तिथे उभे असलेल्या सर्वांना दिलासा मिळतो.

शेजारी असलेले एक वरिष्ठ अधिकारी फोनवर बोलत होते. हिमालयातुन आता सर्वांना दिल्ली येथे जावयाचे होते . थोड्याच वेळात त्यांचं बोलणं पुर्ण होतं आणि ते डॉ.अभिजीतच्या दिशेने वळतात.

"तुम्हा सर्वांना तातडीने जर्मनीला जायला हवं. अग्निपुत्राला मारण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने अनुविस्फोट करायचं ठरवलं आहे." वरिष्ठ अधिकारी डॉ.अभिजीतकडे बघत म्हणतात.

"पण त्याचा मृत्यू तर डॉ.अभिजीतच्या हातून होणार आहे." डॉ.मार्को म्हणतात.

"होय. पण हे फक्त आपल्यालाच माहित आहे, त्यांना नाही." वरिष्ठ अधिकारी म्हणतात.

"मग हे त्यांना लवकरात लवकर सांगावं लागेल." डॉ.अभिजीत म्हणतो.

"जितक्या लवकर होईल तितक्या लवकर तुम्हाला हे करावं लागेल, कारण अग्निपुत्र चीनमधून भारताच्या दिशेने निघाला आहे. आणि माझी खात्री आहे की तो डॉ.अभिजीत यांच्या मागावर आहे." वरिष्ठ अधिकारी म्हणतात.

"मला काहीही करुन त्यांच्याशी बोलायलाच हवं." डॉ.अभिजीत म्हणतो.

"कुणाशी? अग्निपुत्राशी?" अॅंजेलिना विचारते.

"नाही, राष्ट्रसंघातील सदस्यांशी." डॉ.अभिजीत म्हणतो.

अग्निपुत्रTahanan ng mga kuwento. Tumuklas ngayon