भाग 7

284 4 1
                                    

त्या अज्ञात गुहेतून मिळालेल्या सुगाव्यांचा शोध घेत जॉर्डन आणि त्याची टीम तिथेच जवळ एका पडलेल्या झाडाजवळ बसून सक्रीय होते. इम्रान डॉ.अभिजीतला मिळालेल्या आकृतीचं स्केच काढण्यात व्यस्त असतो. डॉ.अभिजीत आणि जॉर्डन मिळालेल्या सुगाव्यांची फेरतपासणी करत असतात. डॉ.मार्को जॉर्डनची मदत करायला येतात तेव्हा डॉ.अभिजीत आणि डॉ.एरिक हातावर उमटलेल्या भाषेची पडताळणी करण्याचा प्रयत्न करतात. अँजेलिना घडलेल्या सर्व प्रकारांमधून निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करते. जॉर्डनच्या समूहाने अनेक शोध लावले होते, अनेक ठिकाणी त्यांना असंख्य अडचणी आल्या होत्या. पण, हा अनुभव त्यांच्यासाठी खूपच वेगळा होता. निष्कर्ष काढत असताना अँजेलिना डॉ.अभिजीतला बोलावते.

"बोला, काय मदत करू?" अभिजीत म्हणतो.

"गुहेमध्ये तुम्हाला नक्की काय दिसलं होतं?" अँजेलिना म्हणते.

"हेच की, ज्या ठिकाणी ती कवटी होती, त्या ठिकाणी एक पोकळ तयार झाली होती. त्या पोकळीमध्ये गेल्यावर मला एक मंच दिसला. जसं की खूप मोठ्या पर्वतावर मी उभा आहे आणि तिथे कुणीतरी एखाद्याला बंदिस्त केलं आहे. त्याची चौकशी सुरु आहे आणि तो समोरच्याला उत्तर देत आहे. तो काहीतरी सांगत होता पण मला त्याची भाषा काळात नव्हती. नंतर अचानक तिथे सगळं अदृश्य झालं आणि एक आकृती तयार झाली. अंधारात सुद्धा ती स्पष्टपणे दिसत होती." अभिजित म्हणाला.

"तो बंदिस्त माणूस नक्की कसा दिसत होता? काही वर्णन करू शकाल?" अँजेलिना विचारते.

"हो. तो बंदिस्त माणूस माझ्या डोळ्यासमोरून जाऊ शकत नाही. त्या माणसाला आपल्यासारखेच हात पण त्यांना फक्त चारच बोटं होती, त्याच्या पायाचे तळवे रुंद होते, त्याला लिंग नव्हते, रंगाने हिरवानिळा असणारा तो पशु बऱ्यापैकी मनुष्य प्राण्यासारखा दिसत होता. मात्र त्याचं तोंड सापासारखं होतं. असा विद्रुप आणि भयानक पशू मी स्वप्नात देखील पहिला नव्हता. त्याच अर्ध शरीर माणसाचं आणि अर्ध शरीर सापाचं होतं." डॉ.अभिजीत बोलतच होता.

अग्निपुत्रWhere stories live. Discover now