भाग 20

139 3 0
                                    

भारतीय वायुसेनेचं विशेष विमान जर्मनीमध्ये पोहोचतं. तिथे विमानतळावर भारतीय दुतावास एका भल्यामोठ्ठया गाडीसह डॉ.अभिजीत आणि त्याच्या टीमची वाट पाहत असतो.

"हॅल्लो, मी विरेंद्र साहा, भारतीय दुतावास आहे. तुम्ही जितका वेळ इथे आहात तितका वेळ मी तुमच्या बरोबर असणार आहे." विरेंद्र डॉ.अभिजीतबरोबर हस्तांदोलन करत म्हणतो.

"आभारी आहोत. आम्हाला संयुक्त राष्ट्रसंघातील सदस्यांना भेटावयास जायचे आहे." डॉ.अभिजीत म्हणतो.

"होय. शक्य तितक्या लवकर तुमची भेट व्हावयास हवी." गाडीच्या दिशेने चालत विरेंद्र म्हणतो.

"म्हणजे?" अॅंजेलिना विचारते.

"तो भारत सोडून आता जर्मनीच्या दिशेने येत आहे." विरेंद्रचे हे शब्द ऐकताच सर्वांच्या भुवया उंचावतात. विरेंद्र त्या सर्वांना लवकरात लवकर संयुक्त राष्ट्रसंघाच्या भव्य अशा कार्यालयामध्ये नेतो जे ८-१० टेनिस कोर्ट सामावतील इतके भव्य असते. सर्व प्रमुख देशांचे विशेष अधिकारी तिथे उपस्थित असतात.

"कोणतीही औपचारिकता न करता आम्ही मुळ विषयाकडे वळतो, आपणांकडे अशी कोणती माहिती आहे, ज्यामुळे त्या दानवाचा नाश होऊ शकतो?" संयुक्त राष्ट्रसंघाचे अध्यक्ष डॉ.अभिजीतला विचारतात. डॉ.अभिजीत आणि त्याची टीम त्यांच्यापासून जवळच एका व्ही.आय.पी. कक्षामध्ये बसलेले असतात. अध्यक्षांनी विचारताच डॉ.अभिजीत आपला माईक चेक करुन बोलायला सुरुवात करतो.

"नक्कीच ही वेळ कोणतीही औपचारिकता पार पाडण्याची नाही आहे. जगावर आता एक असं संकट आलं आहे ज्याला आम्ही कारणीभुत आहोत." एवढं बोलून डॉ.अभिजीत गप्प बसतो.

"तुम्हाला कळतंय का? तुम्ही काय म्हणत आहात ते?" अध्यक्ष विचारतात.

"होय. संशोधनामध्ये आम्हाला काही विशेष पुरावे हाती लागत होते ज्यामुळे मानवजातीच्या इतिहासातील महत्वपुर्ण पैलु उलगडण्यासाठी मदत होणार होती. पण, ते पैलु उलगडता नकळतपणे अग्निपुत्र जागृत झाला." डॉ.अभिजीत म्हणतो.

अग्निपुत्रWhere stories live. Discover now