"अभिजीत, मला सांग, फुजीयामा पर्वतावर नक्की काय घडलं होतं?" रुद्रस्वामी डॉ.अभिजीतला विचारतात. डॉ.अभिजीत विचार करू लागतो.
"त्या वेळी आम्ही तीन गट पाडले होते, अँजेलिना, डॉ.मार्को आणि इम्रान यांना माउंट ओंकटो येथे संशोधनासाठी काही विशेष पुरावे मिळाले नव्हते. साकुजीमा येथे लिसा, डॉ.एरिक आणि ब्रूस यांची देखील तीच अवस्था होती. म्हणून फुजीयामा इथेच आम्हाला पुरावे मिळतील याची जॉर्डनला खात्री होते. आम्ही लगेच पुढच्या चढाईला सुरुवात केली. पहाटेपर्यंत आम्ही दोघेही फुजीयामा ज्वालामुखीच्या टोकाला पोहोचलो. उजाडल्यानंतर आम्ही कामाला लागलो. तिथे अनेक पर्यटक आले होते. त्यांच्या समोर आम्हाला संशोधन करणे जरा कठीणच जात होतं. अगदी ज्वालामुखी कुंडापर्यंत देखील आम्हाला म्हणावे तसे पुरावे मिळत नव्हते. त्या ठिकाणी जास्त वेळ थांबता येत नाही म्हणून सैनिकांनी आम्हाला खाली उतरण्याची विनंती केली." डॉ.अभिजीत बोलत होता आणि सगळे ऐकत होते.
"आम्ही निराश झालो होतो, तिथून निघणार तोच तिथे असलेल्या एका काटेरी वृक्षाला माझा हात लागला. मग अचानक भूकंप झाला. पायथ्याशी असलेल्या लष्कराने लगेचच पर्वताच्या दिशेने हेलिकॉप्टर पाठवले. पर्वतावरील सर्व पर्यटक सैरवैर धावत होते. शक्य तितक्या लवकर आम्हाला पर्वतावरून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. बस्स अजून काही नाही झालं." डॉ.अभिजीत म्हणाला.
"आता पुढे ऐक, मुळात ज्वालामुखी पर्वतावर अग्नीकुंडाजवळ कोणतेही वृक्ष नसते. तिथे जास्तीत जास्त झुडुपे असतात. पण तुझा हात जिथे लागला तिथे काही क्षणापूर्वीच ते वृक्ष अवतरले होते आणि त्या वृक्षाला हात लागून तुझ्या हातातून रक्त आले. त्या रक्ताचे थेंब त्या पवित्र अग्नीमध्ये पडले आणि तो अग्निपुत्र पुन्हा जिवंत झाला." रुद्रस्वामी म्हणाले. अँजेलिनाला आता भीती वाटू लागली होती.
"सर मला खूप भीती वाटतेय." अँजेलिना डॉ.मार्को यांना म्हणते.
"रुद्रस्वामी जी, आता तुम्हीच आम्हाला यातून बाहेर काढू शकता." डॉ.एरिक म्हणतात.
ESTÁS LEYENDO
अग्निपुत्र
Ciencia Ficciónवर्षभरात अग्निपुत्र कादंबरीला सर्व स्तरांवर ५,००,००० पेक्षा जास्त वाचकसंख्या लाभली. हे पुस्तक अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचावे या दृष्टीने पुस्तक Wattpad वर उपलब्ध करण्यात आले आहे.