आफ्रिकेमध्ये झालेल्या विध्वंसामुळे संपुर्ण जग शोकाकूळ होतं. संपुर्ण मानवजातीवर झालेला सर्वांत भयानक हल्ला म्हणून त्याच्याकडे बघितलं जात होतं. २ तासांत ३,००,००० पेक्षा जास्त सैनिक मृत्यूमूखी पडले होते. जग त्या दिवसाकडे काळा दिवस म्हणून बघत होतं. कुणी येशुकडे तर कुणी देवाकडे प्रार्थना करत होतं, कुणी मशीदमध्ये तर कुणी गुरुद्वारामध्ये जात होतं. जो तो मानवजातीच्या रक्षणासाठी प्रार्थना करत होतं.
दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही पत्रकार मोठ्या धाडसाने अग्निपुत्राची मुलाखत घेण्यासाठी जातात. विशेष म्हणजे तो सर्वांना मुलाखत देण्यासाठी तयार होतो.
"बोला." अग्निपुत्र म्हणतो.
"मनुष्यप्राण्याशी आपलं असं कोणतं वैर आहे की आपण संपुर्ण मुनष्य प्राण्याचा अंत करायला निघाला आहात?" एक पत्रकार
"मनुष्य प्राण्याशी माझं कोणतंही वैर नाही. पण माझा जन्म मनुष्य प्राण्याचा अंत करण्यासाठी झाला आहे." अग्निपुत्र म्हणतो.
"पण असं काय कारण आहे की आपण मनुष्य प्राण्याला नाश करायला निघाला आहात?" दुसरा पत्रकार
"कारण हे की तो मनुष्य प्राणी आहे, ४,००० वर्षांपुर्वी काही मनुष्यांनी यज्ञ करुन मनुष्यजातीच्या रक्षणासाठी माझी निर्मिती केली होती. नियमाप्रमाणे १०० मनुष्यांचा बळी द्यावयाचा होता, १०० पेक्षा एका मनुष्याचा देखील जास्त बळी गेला तर हा रक्षकच भक्षक होईल असा तो यज्ञ होता. पण तुम्हा मुर्ख मनुष्य प्राण्यांनी १०० ऐवजी १०७ बळी दिले आणि माझे ध्येय मनुष्य प्राण्याचे रक्षण करण्याऐवजी त्याचा नाश करणे असे झाले." अग्निपुत्राने खुलासा केला.
"४,००० वर्षांपुर्वी झालेल्या चुकीची शिक्षा तुम्ही आता कशाला देता? त्या वेळी ज्या लोकांनी चुक केली होती ते सर्व आता मृत्यूमूखी पडले आहेत. आपण आमच्याशी सामंजस्याने या पृथ्वीतलावर राहू शकता." तिसरा पत्रकार.
"ते कदापी शक्य नाही." अग्निपुत्र चवताळतो.
"कृपया चिडू नका. आमची आपणांस विनंती आहे, कृपया स्त्रीया आणि लहान मुलांना अभय द्या." चैथा पत्रकार.
ŞİMDİ OKUDUĞUN
अग्निपुत्र
Bilim Kurguवर्षभरात अग्निपुत्र कादंबरीला सर्व स्तरांवर ५,००,००० पेक्षा जास्त वाचकसंख्या लाभली. हे पुस्तक अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचावे या दृष्टीने पुस्तक Wattpad वर उपलब्ध करण्यात आले आहे.