संयुक्त राष्ट्रसंघाकडून सर्वोतपरी मदत मिळाल्याने डॉ.अभिजीत आणि जॉर्डन अर्जेंटिना येथे जातात. सुरक्षेच्या कारणास्तव अॅंजेलिना, डॉ.मार्को आणि डॉ.एरिक यांना अमेरिका येथे पाठविण्यात येतं, तिथून ते तिघेही अमेरिकी सैन्यदलाच्या माध्यमातून डॉ.अभिजीत आणि जॉर्डनच्या संपर्कात राहणार होते.
अर्जेंटिनामध्ये :
"मी जॉन कस्र्टन, अर्जेंटिना सैन्यदल आपले स्वगत करत आहे. नौसेनेतील सहकारी आपली मदत करण्यासाठी सदैव तत्पर आहेत." जॉन म्हणतो.
"आम्हाला बम्र्युडा त्रिकोणमध्ये जायचे आहे." डॉ.अभिजीत म्हणतो.
"बम्र्युडा? पण... तिथून... कोणीही परत आलं नाहीये." जॉन म्हणतो.
"आम्हाला त्याची पुर्ण कल्पना आहे. म्हणून केवळमी आणि डॉ.अभिजीत तिथे जाऊ. तिथून आपण आम्हाला फक्त काही अंतरावर सोडायचं आहे. पुढचा प्रवास आम्ही दोघे करु." जॉर्डन जॉनला सांगतो.
"आपण पुन्हा नाही आलात तर?" जॉर्डन कस्र्टन विचारतो.
"तुमच्यासारखे सैनिका आणि सैन्यदल अधिकारी आपल्या जीवाशी खेळून आम्हा सर्वांचं रक्षण करत असतं. आमचं देखील काही कर्तव्य बनतं." डॉ.अभिजीत म्हणतो.
"ठिक आहे, तुम्हाला बम्र्युडापर्यंत पोहोचवण्याची पुर्ण व्यवस्था केली जाईल. आणि तुमच्याबरोबर आमचे 10 सैनिक असतील. पानबूडीमधून आपणा सर्वांना तिथे नेण्यात येईल. पानबुडीची तपासणी सुरु आहे, सर्व चाचण्या झाल्यानंतर दोन तासांमध्ये तुम्हाला बम्र्युडाजवळ नेले जाईल." जॉन बोलतो आणि पुढे चालू लागतो. नंतर थोडं थांबून तो जॉर्डन आणि डॉ.अभिजीतच्या दिशेने वळतो.
"एक काम करतो, तुमच्याबरोबर मी सुध्दा येतो." जॉन कस्र्टन म्हणतो.
"सर तुम्ही?" जॉर्डन आश्चर्याने विचारतो.
"का नाही? तुम्ही संशोधक असून इतकी मोठी जोखीम पत्कारु शकता तर मी का नाही?" जॉन जॉर्डनच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो.
दुसरीकडे अग्निपुत्राला थांबवण्यासाठी संपुर्ण जग एकत्र आलेलं असतं. जर्मनीहून त्याची वाटचाल अर्जेंटिनाच्या दिशेने सुरु असतेच. वाटेत आफ्रिकेमध्ये त्याच्यासमोर भलीमोठ्ठी फौज येते. अमेरिका, रशिया, भारत, चीन, जपान, ब्राझील आणि फ्रान्सचे सैनिक मोठ्या संख्येने त्याच्यासमोर उभे राहतात. हेलिकॉप्टरमधून कॅमेराद्वारे संपुर्ण जग त्याची वाटचाल बघत असतं. मोठ्या विध्वंसानंतर आणि वाटचालीनंतर अग्निपुत्र पहिल्यांदाच थांबतो.
ВЫ ЧИТАЕТЕ
अग्निपुत्र
Научная фантастикаवर्षभरात अग्निपुत्र कादंबरीला सर्व स्तरांवर ५,००,००० पेक्षा जास्त वाचकसंख्या लाभली. हे पुस्तक अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचावे या दृष्टीने पुस्तक Wattpad वर उपलब्ध करण्यात आले आहे.