शशशश...
अरे अरे उठू नकोस तू..प्रिया अतुलच्या डोक्यावरुन हात फिरवत म्हणाली.
तुला झोपेची गरज आहे.
तू शांत झोप आधी.
तुझी झोप झाली की बोलूया आपण.
ती पुढे काय बोलली ते अतुलला समजले देखील नाही.
तो पुन्हा एकदा निद्रादेवीच्या अधीन झाला.अतुलने पुन्हा डोळे उघडले तेव्हा प्रिया आणि तिचे वडील त्याच्याच बेड जवळ बसलेले होते.
अतुल जागा झाल्याचे पाहताच प्रियाचे वडील डॉक्टरांना बोलवायला निघून गेले.अतुल खूप गोंधळला होता.
त्याची चलबिचल प्रियाला समजली.प्रिया: सगळं सांगेन तुला.
तू आधी जेऊन घे.
तुझ्यासाठी रात्रीचे जेवण आणले आहे.
आजची रात्र इथेच दवाखान्यात थांबावे लागणार आहे.
उद्या सकाळी काही टेस्ट केल्या की मग दुपारी आपल्याला घरी जाता येईल.प्रिया बॅगमधून जेवण बाहेर काढेपर्यंत डॉक्टर आले होते.
डॉ: मिस्टर अतुल, उद्या आपण एम आर आय स्कॅन आणि रूटीन ब्लड टेस्ट करणार आहोत.
तुम्हाला भोवळ नेमकी कशामुळे आली आणि पाठीतले लिगामेंट्स तर दुखवले नाहीयेत ना हे सर्व त्यातून समजायला मदत होईल. तसे काळजी करण्यासारखे काहीच नाहीये पण खबरदारी म्हणून आपण हे सगळे करणार आहोत.अतुल: ओके सर
या दोन शब्दांपलीकडे अतुल काहीच बोलू शकला नाही.
खरे तर जे चालले होते त्यावर त्याचा अजूनही विश्वास बसत नव्हता.
आजपर्यंतच्या त्याच्या जीवनप्रवासात असा प्रसंग पहिल्यांदाच उद्भवला होता.मात्र एका गोष्टीने तो मनोमन सुखावला होता.
प्रिया त्या बंद खोलीतून बाहेर आली होती.
नव्हे, तिच्या दादांनी तिला बाहेर आणले होते.डॉक्टर निघून जाताच अतुलने प्रियाकडे बघत तिच्याच वडिलांना विचारले की, या कोण आहेत.
सुरेश: अरेच्चा..
तुमची ओळख नाही का झाली अजून?
ही माझी मुलगी प्रिया आहे.
आज सकाळीच गावाहून आली.
तिची मावशी गावाकडे आजारी पडली होती म्हणून मीच मदतीसाठी पाठवले होते.
मी तिला बसस्टेशन वरून घेऊन आलो आणि आम्ही दोघांनी तुम्हाला जिन्यात बेशुद्ध पडलेले बघितले.
तिने तुम्हाला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न केले पण तुमची काहीच हालचाल होईना म्हणून मग जीपमधून तुम्हाला इथे आणले.

YOU ARE READING
ट्रॅप ✔️
Mystery / Thrillerअतुल एक अत्यंत होतकरू मुलगा. कोकणात अगदी समुद्रकिनारी असलेले आपले घर आणि आई यांना सोडून नशिब आजमवयला शहरात येतो. दोन तीन वर्ष उलटतात. बऱ्याच खस्ता खाल्ल्यानंतर आणि अनुभवानंतर त्याला मनासारखी चांगल्या पगाराची नोकरी मिळते. लवकरात लवकर लग्न करायचे आणि...