२.

3.3K 12 4
                                    

अतुल काही क्षण तिथेच थिजल्यासारखा उभा राहिला.

अचानक टेंपो ट्रॅव्हलर सुरू होण्याच्या आवाजाने तो दचकला.
त्याने गर्रकन मान फिरवली.
आजही त्याच्या डोळ्यासमोरून नेहेमीप्रमाणे तो टेम्पो निघून गेला.
आणि आतासुद्धा त्याला ड्रायव्हरचा चेहरा नीट दिसला नाही.
या अनोळखी चेहऱ्याबद्दल माधवला विचारावे म्हणून अतुल त्याला पुन्हा हाक मारणारच होता, पण त्याने ओठ शिवले.
माधवला पुन्हा त्रास देणे त्याला योग्य वाटले नाही.

HELP मागणारा कोण असेल?
सगळे फ्लॅट्स तर बंद दिसतात.
कसली हेल्प हवी असेल?
कोणी आपल्यासोबत काही प्रँक तर नसेल ना करत?असे अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात तांडव करत होते.

आज पायऱ्या चढताना डाव्या बाजूकडील प्रत्येक फ्लॅटच्या दरवाजाला कान लावत, चाहुल घेत-घेतच तो स्वतःच्या फ्लॅटपाशी येऊन पोहोचला.
आणि आज एक आश्चर्य घडले होते.
समोरच्या फ्लॅटला चक्क कुलूप नव्हते.
त्याचे डोळे चमकले.
म्हणजे तो हेल्प मागणारा संशयित याच फ्लॅट मधला असणार.
अशी शंका त्याला येत होती.

एक क्षणही न दवडता अतुलने त्या फ्लॅट नं. ९ ची डोअर बेल वाजवली.
बेल बहुधा वाजलीच नाही.
मग अतुलने कडी वाजवली.

खड खड खड..

सर्व मजल्यांवर कडीचा आवाज घुमला.
आतून काहीच प्रतिसाद आला नाही.
दरवाजा उघडायला कोणीच आले नाही.

अतुल हताश होऊन स्वतःच्या दाराकडे वळला.
कडी-कुलुप उघडून तो आत शिरणार तितक्यात समोरचा दरवाजा उघडला.
अतुलने हसत मागे वळून पाहिले.
त्याच्या चेहऱ्यावरचे स्मित लगेचच मावळले.
कारण ज्या व्यक्तीने दरवाजा उघडला होता त्याचे व्यक्तिमत्त्व डोळ्यास सुखावणारे नव्हते.

वर्णाने काळा सावळा.
पसरट मोठ्ठे नाक.
सूज आल्यासारखा मोठ्ठा चेहरा.
भोकरासारखे डोळे.
कपाळावर उजवीकडे एक टेंगुळ.
चेहऱ्यावर खूप खड्डे आणि व्रण.
उंच, धिप्पाड देह.
हेअर-डाय लावून काळेकुट्ट रंगवलेले केस.
थोडी ढेरी पुढे आलेला आणि साधारण पन्नाशीच्या आसपासचा तो मनुष्य.

ट्रॅप ✔️Where stories live. Discover now