७.

1.8K 9 4
                                    

अतुलचे लक्ष तिच्या हातांकडे गेले.
त्याने क्षणाचाही विलंब न करता प्रियाच्या हातून काचेचा तुकडा हिसकवला.
प्रिया स्वतःच्या जीवाचे काहीतरी बरेवाईट करणार होती.

अतुलने तिला गालावर एक जोरदार चापट लगावली.

अतुल: पियू काय मिळणार आहे तुला असे करून?
जीव एवढा स्वस्त झालाय का की इतक्या अविचाराने काही क्षणात तू संपवून टाकणार?
आणि ही काच कुठून आली तुझ्याकडे?

प्रियाचे डोळे रडून लालेलाल झाले होते.

प्रिया: दादांना माझ्यामुळे खूप मनस्ताप होत असतो.
त्यांनी पण आज माझ्यावर हात उगारला.
तूही मला मार.
मला जगण्याची इच्छाच राहिली नाहीये आता.

असे म्हणत गुडघ्यांवर डोके ठेऊन प्रिया पुन्हा रडू लागली.

अतुल: अगं, सज्ञान आहेस ना तू?
स्वतःसाठी न्याय मिळव.
तुझ्या जाण्याने तुझ्या वडिलांच्या समस्या कमी नाही होणार तर वाढतील.
त्यांचा तरी विचार कर.
मी त्यांना जरी खूपदा भेटलो नसलो तरी मला माणसांची पारख आहे.
तुझे वडील मनाने खूप हळवे आहेत.
त्यांना तुझी काळजी आहे म्हणून ते तुझ्याशी असे वागत असतील गं.
बाहेरच्या जगात तुझी पुन्हा फसवणूक होऊ नये म्हणून ते तुला जपत आहेत.
तू पुन्हा त्यांचा विश्र्वास संपादन कर.
ते तुझी सगळी स्वप्न पूर्ण करतील बघ.

अतुलचे बोलणे ऐकून प्रिया लहान बाळासारखे ढसाढसा रडू लागली.
अतुल तिच्या जवळ बसला.
त्याने तिचे डोळे पुसले.
केसांच्या लटा मागे करत तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
त्या प्रेमळ स्पर्शाने प्रिया सुखावली.
आणि अतुलच्या आणखी जवळ सरकून त्याला घट्ट बिलगली.
ती हुंदके देतच होती.
अतुलने तिला कवेत घेतले आणि तिच्या डोक्यावरून, पाठीवरून प्रेमाने हात फिरवू लागला.
त्याने तिच्या कपाळावर अलगद ओठ टेकवले.
प्रिया लाजून मागे झाली.
अतुलला तिच्या मर्जी विरूध्द वागायचे नव्हते.
आणि तो संधीसाधू तर मुळीच नव्हता.
त्याला चूक समजली.
त्याने त्याची मिठी सैल केली.

ट्रॅप ✔️Onde histórias criam vida. Descubra agora