' चाबऱ्या ' भाग ६

3K 8 0
                                    

________________________________________________

" गडी लय रांगडा हाय बग सगुने... ह्याs ह्याs ह्याs.."

बाजारात पोहचल्यावर कौशी टिल्याची आई सुमन कडे पाहुन तिला चिडवत होती. सुमन तर चलबिचल अवस्थेत तिला फक्त पाहतच होती.

सगुणी अजुन ही कोड्यातच होती. कौशी ने सगुणीला बाजुला नेऊन सगळं सांगितलं. सगुणी आ वासून टिल्याची आईं सुमनकडे पाहु लागली.

सुमन त्यांच्याकडे येत हळु आवाजात म्हणाली, " अय पोरीहो... यातलं कुनाला काय सांगु नका.. उगा हाकलुन देत्याल गं गावातनं.. अन् संसार बी मोडल गं महा."

कौशी अन् सगुणी थोडा विचार करत म्हणाल्या, " नाय ओ.. हे काय सांगत असत्यात व्हय कुनाला.. नगा लय इचार करु... पर आज ना उद्या असलं पाप कुनालाबी कळतंच असतंय.."

"अन् त्या रुक्मिला कळलं तर जीव देईल की बिचारी...!" सगुणा म्हणाली.

सुमनही तो विचार करून थबकलीच. पण पुन्हा सगळे बाजारात व्यस्त झाले.

तिकडे सुशालाला मात्र अन्न पाणी गोड लागले नाही. सतत तिला चिंता खाऊ लागली, ' जर गोदीमुळं गावात हे पसरलं तर...! ... सुभानरावास्नी कळलं तर...! .... आयो....!'

सुशाला पुरती बिथरली होती. याच विचारांत ती चार रात्री व्यवस्थित झोपु शकली नव्हती. बबनचा सुद्धा काहीच थांगपत्ता नव्हता.

" अय परताप... आरं थांब की..."

"काय गं सुवर्ने..! आज बी ईश्टी हुकली का काय..? "

प्रताप त्याची गाडी थांबवत बोलला. तालुक्याला असणाऱ्या कॉलेज वरुन स्टँड कडे निघालेली सुवर्णा अचानक त्याच्या समोर आली होती.

" आरं ईश्टी नाय हुकली ... तु दिसलास म्हनुन हाक मारली रं... आनं ईश्टी हुकल्यावरच घरी सोडनार व्हय फक्त तु ? "

सुवर्णा डोळे बारीक करत, दोन्ही हात कमरेवर ठेवत थोडी रागातच बोलली.

" वाह गं तुहा रुबाब.... नाकाचा शेंडा फुगुन लाल हुईल... हॅहॅहॅ...बस चल." प्रतापने किक मारली, तशी सुवर्णाही गालात हसत मागे बसली. गाडी गावाचा रस्ता धरून निघाली.

' चाबऱ्या ' - जिंदगानीचं भाडं फेडताना लागलेली ठेसHikayelerin yaşadığı yer. Şimdi keşfedin