★⁠ 𝐂ɦαρ𝗍𝖾𝗋 11 ★⁠

50 12 65
                                    

Gandhar was mesmerized by her beauty the second he glanced at her.

The moment he entered, his nostrils met a familiar fragrance of Mogra flowers neatly arranged into a beautiful garland which adorned Devashree's long silky locks.

The way that saree was draped gracefully around her curvy figure, surged a feeling of protectiveness and passion in his heart.

"नाजूक ही मोग्र्याची पाकळी,
तरही प्रेमाची अतूट साखळी.
जणू दिसे नवी कोवळी,
तरही हृदयी स्वच्छंद मोकळी.

सौंदर्य शब्दात मांडू शकत नाही हेच खरे. तिचे ते मनाला एका शांत समुद्राच्या तटावर पोहोचवणारे हास्य जणू मला तिच्याकडे खेचू पाहतंय, तिचे पाणीदार बोलके डोळे, काही न बोलता ही बरेच काही सांगू पाहतात, मला त्यांच्यात हरवू पाहतात, त्यांच्यात सामावू पाहतात, तिच्या आवाजातील मरदवता, ते मृदुत्व, मला माझ्या हृदयाच्या एका शांत कोपऱ्यात नेऊन पोहोचवते जिथे तिने केव्हाच आपल्यासाठी घर केलेले आहे. मला बघितल्यावर तिच्या चेहऱ्यावरील भावांमध्ये होणारे बदल, जणू मला खात्री पटवून देतात की ती माझीच आहे, फक्त माझी. तिचं माझ्या आयुष्यातील स्थान, तिने माझ्या जगण्याला दिलेला अर्थ, सगळं सगळं बाजूला ठेवणे फार अवघड आहे, विसरणे तर अशक्यच. रात्रीच्या गच्च काळोखात, वाट दाखवणारा काजवा आहे ती. तप्त अश्या जीवनहीन मरुभुमिवर आशेची भावना निर्माण करणारं एक हिरवेगार पान आहे ती. सोसाट्याच्या वाऱ्यातून, वादळातून वाट काढणाऱ्या वाटसरूला हवे असणारे संरक्षण आहे ती माझ्यासाठी. खूप अनमोल असे, खूप गरजेचे, पण कदाचित मिळूनही न मिळण्यासारखे सूख आहे ती. तिच्या सौंदर्याचे कौतुक करावे तितके थोडेच आहे, ती निळी साडी, जी अगदी तिच्यासाठीच तयार केलेली आहे, अशी तिच्या अंगाला बिलगून राहिलेली, ते गुलाबी ओठ जे कोरडे झाल्यावर पुन्हा तिच्या रसनेच्या स्पर्षामुळे चमकू उठतात. ते मऊ, लांब, चॉकलेटी रंगाचे केस, ज्याचात तो सुवासिक मोगरा माळलेला असतो, मला नेहमी आकर्षित करतात, त्यांना हातात घेयला, त्यांच्यात गुंतायला, त्यांचा सुवास मनात साठवून ठेवायला. तिच्या छोट्याशा पायांमध्ये माझ्या कर्णांना तृप्त करणारे पैंजण किती मनमोहक आहेत ह्याची जाणीव मला तिच्या प्रत्येक पावलावर होते. अंतर्बाह्य शांती देणारी, समाधानी करणारी आहे ती. देवी आहे माझ्यासाठी माझी देवश्री. पण मी तिचा भक्त होऊ शकेन का, याची संदिग्धता अजूनही माझ्या मनात मला खात राहते." Gandhar was thinking while being lost in her eyes.

𝘛𝘶𝘫 𝘝𝘪𝘯 𝘔𝘪 𝘈𝘱𝘶𝘳𝘪.Where stories live. Discover now