252 0 0
                                    

दुपार झाली. प्रकाश निघतच होता. तेवढ्यात त्याला अनेक वर्षांपासून समोर राहणारे शिरवळकर भेटले.
“काय रे प्रकाश, आज ऑफिसला सुट्टी का?” शिरवळकरांनी सहज चौकशी केली.
“सुट्टी कसली काका, कामासाठीच चाललो आहे.”
“कुठे बाहेरगावी काम आहे का?” प्रकाशच्या हातातली सूटकेस बघून काकांनी विचारले.
“नागपूरमध्ये आमची दुसरी शाखा आहे, तिकडेच निघालो आहे आता.”
“अरे वा! मी सुद्धा नागपूरलाच निघालो आहे. चल, एकत्रच जाऊ.”
“अहो नको काका, तुम्हाला कशाला त्रास उगीच! मी जातो ना रेल्वेने.”
“त्रास कसला. तेवढीच मला सोबत होईल रे.” काका म्हणाले.
“सोबत? काकू नाही येणार का तुमच्याबरोबर?”
“अरे नाही, एका मित्राकडे जायचं आहे.तिथे कशाला न्यायचं हिला?” काका हळूच डोळा मारत म्हणाले, “बरं मला सांग, नागपूरात कुठे जायचं आहे तुला?”
“सिताबुल्डी. स्टेशनच्या जवळच.”
“मग तर चलच तू बरोबर. मलासुद्धा तिथेच जायचे आहे.”
प्रकाश त्याच्या पुढच्या ‘महत्त्वाच्या’ गोष्टींचा आराखडा बदलत म्हणाला, “ठीक आहे काका. चला एकत्रच जाऊ.”
प्रकाश आणि शिरवळकरांनी निरोप घेतल आणि काकांनी त्यांच्या गाडीला किल्ली मारली.

अपुरी इच्छाDonde viven las historias. Descúbrelo ahora