१०

183 0 0
                                    


प्रकाश लगेच खोट्या आवेशाने म्हणाला, “ठीक आहे. चुका होतात.” त्या इसमाच्या चेहऱ्यावर स्मित आले.
“कुठे आहेत कुठे मालक तुमचे?”
“बाहेर थांबले आहेत म्हणाले.”
प्रकाशने साहेबांकडून त्याचं पाकीट आणि इतर सर्व सामान घेतलं आणि दाराबाहेर पडला.
प्रकाशने चौफेर नजर फिरवली. बाहेर काळाकभिन्न अंधार पसरला होता. उशीर झाल्याने घरांमधले दिवेही बंद होते. त्या माणसाच्या म्हणण्याप्रमाणे त्याचे ‘मालक’ बाहेरच थांबले होते. त्या मालकाला भेटायची उत्सुकता प्रकाशच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. ज्या माणसासाठी तो स्वत:च्या बायकोशी खोटं बोलून, ऑफिसला न जाता मुंबईहून नागपूरपर्यंत आला होता तो माणूस आता त्याच्या समोर येणार होता. तो पाठलाग, ‘नक्की ध्येय काय’ हे माहित नसलेला पाठलाग, फक्त उत्सुकतेपोटी केलेला पाठलाग आता संपणार होता. ज्या माणसाबद्दल त्याने खूप बातम्या वाचल्या , ज्याच्या बद्दल त्याला इतकं कुतूहल वाटलं, तो ज्याला भेटला..बहुतेक..तो आता त्याच्या समोर येणार होता. पण त्याच माणसाबद्दल त्याने दोन बातम्या वाचल्या होत्या. एक निधनाची तर दुसरी पंचाहत्तरीची!
ह्या सगळया प्रश्नांची उत्तरे द्यायला येणार होता, त्या माणसाचा मालक, जो प्रकाशची वाट बघत थांबला होता. पोलिस ठाण्याबाहेर. 
म्हणजे..म्हणजे त्या माणसाला माहित होते की प्रकाश येणार. तो आला आहे. आपल्या घरी येऊन गेला. मालकाला हे ही माहित होते की आपल्या माणसाने त्याला पोलिसांकडे नेले आहे.  कदाचित...प्रकाशने जी सावली बघितली ती त्याचीच असेल. पण मग तो बाहेर प्रकाशची वाट का बघत असेल? त्याला माहित होते की प्रकाश कोण आहे . त्याला माहित होते की प्रकाश येणार. कदाचित त्याला तेच अपेक्षित असेल. तो प्रकाशची वाट बघत होता!
हे सगळे विचार डोक्यात येऊन गेल्यावर प्रकाशची उत्सुकता अजूनच वाढली. त्याला ओढ लागली उत्तराची. त्याला पडलेल्या सगळ्या प्रश्नांच्या उत्तराची. पण..
बाहेर होता फक्त अंधार. प्रकाश अंधारात एकदाच उभा होता. 
प्रकाश परत ठाण्यात गेला.
“काय दादा, काही राहिलं का?” त्या इसमाने अदबीने विचारलं.
“अं..नाही. तुम्ही म्हणालात की मालक बाहेर थांबले आहेत. कुठे आहेत?” प्रकाश.
“कुठे आहेत म्हणजे? असतील ना बाहिरचं कुठेतरी. या इकडं. मी दावतो.” असं म्हणून तो इसम प्रकाशला घेऊन बाहेर पडला.
एका गाडीकडे बोट दाखवत तो म्हणाला, “ते काय तिथं..जावा, वाट बघत असतील.”
प्रकाशला नक्की आठवत होतं की तो आधी बाहेर आला होता तेव्हा ती गाडी तिथे नव्हती.
प्रकाश त्या गाडीच्या  दिशेने चालू लागला. तिकडे साहेबांच्या आणि त्या इसमाच्या गप्पांचा आवाज हळू हळू कमी होत गेला. प्रकाशला अजूनच अंधार जाणवू लागला.
तो चालत होता. त्याला गाडीच्या आसपाससुद्धा कोणी दिसत नव्हते. त्या सबंध रस्त्यावर तो एकटाच होता. जो माणूस दिसणं अपेक्षित होतं त्याची साधी चाहूलसुद्धा नव्हती.तरी प्रकाश शांतपणे, धीराने त्या दाखवलेल्या दिशेने चालत होता. रात्रीचा गार वारा त्याच्या तोंडावर येऊन धडकत होता.
त्या वाऱ्याच्या आवाजातच एक आवाज त्याच्या कानात सांगून गेला, “उलट्या दिशेला.”

अपुरी इच्छाDonde viven las historias. Descúbrelo ahora