आई काय करते : भाग १

6.1K 25 10
                                    

आई काय करते भाग १

वि. स. खांडेकर म्हणतात, "माणूस हा झाडासारखा आहे, तो सुखासुखी वठत नाही, तो ओलावा शोधत राहतो. त्याचं खरं प्रेम असतं- जीवनावर! मग ते जीवन कितीही विद्रुप, कितीही भयंकर असो! कारण मृत्यूनंतरच्या अंधारात कुठलीही चांदणी चमकत नाही हे तो मनोमन जाणतो... "

या वि. स. खांडेकर यांच्या ओळी मनुष्य जीवनाला हुबेहूब मॅच होतात. कारण माणूस हा आपल्या जीवनात असाच ओलावा शोधत असतो. हा ओलावा शोधण्यासाठी कधी कधी त्याला पूर्ण आयुष्य झुंजावे लागते. काहींना हा ओलावा कमी वयातच भेटतो. पण ते सहजासहजी पचन करत नाहीत. मग असाच ओलावा ते दुसऱ्या ठिकाणी शोधत राहतात. सांगण्याचा उद्देश म्हणजे माणसाकडे कितीही धनसंपत्ती आली तरी या ओलाव्यासाठीच तो जीवनभर झुंजत असतो. हा ओलावा म्हणजेच प्रेम, प्रणय, ओढ, जिव्हाळा, आपुलकी यांचे मिश्रण होय.

आपल्या समाजाने नैतिक आणि अनैतिक असे दोन प्रांत तयार केले आहेत. यात प्रेम असेल तर नैतिक म्हणावे आणि अनैतिक असेल तर मात्र त्याला समाजात मान्यता नाही. त्याला हवस, वासना यासारखे शब्द वापरले जातात. कधी कधी प्रत्येक अनैतिक प्रेमाला वासना हा शब्द वापरणे योग्य नव्हे. कारण एखादा प्रसंग, एखादे नाते या समाज रचित व्याख्याना अपवाद असू शकतो. हा अपवाद आपल्याला तेव्हाच समजू शकेल, जेव्हा आपण  निरीक्षणपूर्वक हे नाते तपासून पाहू. पण या व्यवहारिक जगात कोणालाच इतका वेळ नाही की दुसऱ्याचे नाते नैतिक आहे की अनैतिक आहे याचा पडताळा पहावा. म्हणून उठ सूट लोक एखाद्या पवित्र नात्याला कलंकित करत असतात.

ही गोष्ट आहे एका शिक्षकाची किंवा शिक्षण नावाच्या आदर्श गोष्टीला बाजार करण्याची. एका निमशहरातील खूप वर्षापासून असलेली शाळा. पण अलीकडच्या काळात शाळेची प्रत थोडी खालावत होती. जुने शिक्षक रिटायर्ड झालेले होते आणि नवीन शिक्षक असे भेटत होते की सायन्स, कॉमर्सला ऍडमिशन नाही भेटले म्हणून बीएडला ऍडमिशन घेतले. इंजिनियरिंगची स्वप्ने बघितली. पण मार्कांनी सांगितले की या जन्मात तरी तुमची कुवत नाही. म्हणून काय करायचे, तर चला बीएड करून शिक्षक होऊया. म्हणजे पूर्ण मे महिन्याची आणि दिवाळीची सुट्टी भेटेल. तरी शिवाय इथे लेट सीटिंग नसते. शाळा जास्तीत जास्त सहा ते सात तासात असावी म्हणजे कारखान्यापासून कॉर्पोरेट पर्यंत ज्या हालपिष्ट सहन कराव्या लागतात, तशा हालअपेष्टा इथे होणार नाही. असा समज करून एका विशिष्ट प्रजातीने बी.एड. ला ऍडमिशन घेऊन शिक्षक व्हायचे ठरविले आणि शिक्षण ही शाखा मलीन होऊ लागली. गेल्या चार ते पाच वर्षात या प्रजातीने या शाळेत जरा जास्तच शिरकाव केला होता त्यामुळे शाळेची प्रत अपेक्षेप्रमाणे खालावत होती. दर सहा महिन्यांनी शिक्षक बदलत होते. इयत्ता दहावीची ही बोर्ड परीक्षा परीक्षा सात महिन्यांवर येऊन ठेपली होती. तसे बाकी विषय ठीक होते. पण गणिताची अवस्था फारच बिकट होती. गणिताचे शिक्षक सोडून दोन महिने झाले होते. दोन महिने दहावीच्या वर्गाला गणिताचे प्रॉपर असे शिक्षक नव्हते. मग कधी इतिहासचे सर, तर कधी पीटीचे सर, ते कधी भूगोलाच्या मॅडम येऊन आपले गणित किती वाईट आहे हे दाखवून देत असत. अर्थातच याचे नुकसान दहावीच्या विद्यार्थ्यांना होत होते

आई काय करतेWhere stories live. Discover now