कथा : आई काय करते
भाग : दोनसरांच्या या प्रश्नावर श्यामली हाच विचार करत असे की आई काय करते या प्रश्नाचे उत्तर काय द्यायचे. आणि आता हा प्रश्न रोजचा झाला होता. जेव्हा जेव्हा गणिताचा त्रास असे तेव्हा सर याच प्रश्नाची सरबती लावत असत. पण श्यामलीला या प्रश्नाचे उत्तर काय द्यायचे यासाठी तिची मेणबत्ती काही पेटत नव्हती. मग ती असेच उडवा उडवीचे उत्तर देत असे की आई आहे घरी. त्यावर सर म्हणत असे की आईला सांग की मी विचारले म्हणून.
त्यावर श्यामली विचार करत असे की आईला का सांगायचे की सरांनी विचारले म्हणून. आई तर त्यांच्याशी कधी बोलली सुद्धा नाही. त्यांना बघितले सुद्धा नाही. तरी आईला का निरोप द्यायचा. पण आता हे रोजचेच झाले होते. त्यामुळे सर दुसऱ्या दिवशी विचारत असे. काय मग आई काय म्हणत होती. त्यावर तिच्याकडे अजिबात उत्तर नसे. मग तिनेच त्या दिवसापासून आईला सांगायला सुरुवात केली की गणिताचे रोहित सर तुला विचारत होते. आईला पण प्रश्नचिन्ह उभे राहिले. पण आईने श्यामली पेक्षा जास्त पावसाळे बघितले होते म्हणून तिच्या मनात ही समीकरणे तितकीशी तिरकस किंवा किचकट नव्हती.
दुसऱ्या बाजूला रोहित सरांच्या मनात श्यामली बद्दल काय चालू होते हे खुद्द रोहित सरांनाच माहीत होते. जी मुलगी इतकी सुबक आणि कोरीव आहे तेही वयाच्या पंधराव्या वर्षी तर तिची चाळिशीतील आई किती छान दिसत असेल असे समीकरण रोहित सरांच्या डोक्यात रंगत होते. कारण स्त्री चाळीस वर्षाची झाली की सौंदर्यात ती नवा जन्म घेते. फक्त त्या स्त्रीला आपल्या सौंदर्याबद्दल काळजी हवी. मग निसर्गच तिच्यावर खुश होऊन एखाद्या 25 किंवा 30 वयाच्या मुलीला लाजवेल असे सौंदर्य चाळीशीत त्या स्त्रीस बहाल होते आणि जर या स्त्रीने साडी घातली असेल तर मग विचारूच नका. तिच्या खांद्यावरचा ओझरता पदर, तिच्या पोटात रोवलेल्या त्या निऱ्या, तिच्या कमरेवर असलेली मांसलयुक्त चरबी तिच्या सौंदर्यात फक्त आणि फक्त चार चांद लावत असतात. ही सगळी बेरीज वजाबाकी रोहित सरांच्या डोक्यात गेली होती. त्यामुळे श्यामलीची आई कशी दिसत असेल याचेच मोजमाप ते लावत होते.
शिवाय त्या हाऊस वाईफचा नवरा हा परदेशात असतो. श्यामलीने दिलेल्या माहितीनुसार तो शेवटच्या दिवाळीत आला होता. मागच्या वर्षीची दिवाळी जाऊन बराच अवधी उलटला होता. इतके दिवस एखादी स्त्री संभोगाशिवाय कशी राहू शकते आणि राहिलीच तर तिच्या मनात चाललेली उलथा पालथ ही निकराची असेल याची रोहित सरांना जाणीव होती. याच संधीचा फायदा घेऊन त्यांनी अंधारात तीर मारायचे ठरविले होते. त्यामुळे आपला जॉब जरी गणित शिकवायचा असला तरी विद्यार्थ्यांमध्ये ते आपली शिकार शोधत होते. हेच प्रतीक होते की आता आपल्या जमान्यात जसे शिक्षक होते तसे शिक्षक आता राहिले नाहीत किंवा काही चुकीच्या शिक्षकांमुळे शिक्षकी पेशा हा मलीन होत आहे.
पुढच्या दिवशी रोहित सर पुन्हा श्यामलीला बोलले की काय ग बाबा आले का?या रोजच्या प्रश्नांनी श्यामली आता लगेच उत्तर देत होती. नाही बाबा अजून आले नाहीत.
मग आई काय करते हा पुढचा प्रश्न रोहित सरांचा तयारच असे.
त्यावर ती उत्तर देत असे की आई घरीच आहे.
त्यावर रोहित सर पुन्हा विचारत असे मग आई काय म्हणते.
त्यावर ती म्हणत असे की आई ठीक आहे असे उडवा उडवीचे उत्तर देऊन ती आपला संवाद संपवत असे.
सरांच्या या तीन प्रश्नांनी श्यामली गोंधळून जात तर होतीच. पण इतर विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मनात काय म्हणत असतील यावर तिलाच आपली लाज वाटत होती. दहावीची परीक्षा जवळ येत होती. या उरलेल्या महिन्यात जोमाने अभ्यास करावा असे हे महिने होते. पण बिचारी या आई काय करते या प्रश्नांनी ती खालावून जात होती. रात्री टीव्हीवर आई काय करते ही सिरीयल जर आठवड्यातून पाच दिवस दिसत असेल. तर सरांचा आई काय करते हा प्रश्न आठवड्यातून सहा दिवस श्यामलीला विचारला जात असे.भाग तीन लवकरच
मखमली कथा