गेल्या एक तासात असे जे झाले होते, ते नक्कीच अभिप्रेत नव्हते. पण एखाद्या प्रेतालाही सुद्धा हेवा वाटेल आणि ते प्रेत जिवंत होऊन उभे राहील असे काही गेल्या एक तासात झाले होते.
पैसे देऊन एखाद्या वेश्येकडून जितका आनंद भेटणार नाही तितका आनंद इथे रेलचेल करत होता. अति महत्त्वाच्या शिक्षण या शाखेत किंवा आपण शिक्षण हे क्षेत्र अति महत्त्वाचे मानून त्याच्यासमोर आपले सर्वस्व वाहायला तयार होतो. रुचिताने आपली इच्छा नसतानाही आपल्या मुलीसाठी, मुलीच्या शिक्षणासाठी, मुलीच्या भवितव्यासाठी ही तडजोड केली. पण ही गृहिणी, ही हाउसवाइफ आपल्या आतील आनंदासाठी झटत होती. तिने आपल्या इच्छा आकांशा या आपल्या कुटुंबासाठी दाबून ठेवल्या होत्या. प्रत्येक हाउसवाइफला तिचा एक स्वतंत्र दृष्टिकोन असतो. तो दृष्टिकोन अगर अनैतिक मार्गाचा असेल तर सर्व पुरुष वर्ग किंवा समाजातील तिच्याशी निगडित असलेल्या स्त्रिया या तिला टोचून टोचून खाऊन टाकतात. तिच्या आतले माणूसपण मारून टाकतात. पण हाऊस वाईफ होणे हा गुन्हा नाही ही एक जबाबदारी आहे. तिच्याच कुटुंबाने दिलेली जबाबदारी ती इमाने इतबारे प्रामाणिकपणे करत असते. पण तिच्या वाटेला फक्त उपेक्षा येतात. कधी कधी नवरा परदेशात, परगावी राहून आपल्या इच्छा परस्त्री बरोबर पूर्ण करत असतो. पण हाऊस वाईफ ही फक्त प्रामाणिकपणे आपल्या इच्छा मारून मिटवून त्याची म्हणजेच आपल्या नवऱ्याची वाट पाहत असते. ही वाट पाहताना कधी कधी तिची वाट लागते पण ती प्रामाणिक राहते. शेवटी म्हातारे होऊन मुले मोठी झाली की ते याच हाउसवाइफला वृद्धाश्रमाचा मार्ग दाखवतात आणि हीच हाऊस वाईफ शेवटी आपण आयुष्यात हरलो याची उणीव घेऊन वृद्धाश्रमातच शेवटचा श्वास घेते.भाग ११ लवकरच