आई काय करते : भाग ४

3.5K 18 6
                                    

आई काय करते
भाग ४

रुचिता आता विचारांच्या गर्दीत चक्रावून गेली होती काय करावे कुणाची मदत घ्यावी याचा तिला थांगपत्ता लागत नव्हता आणि हे कोडे जर सोडवले नाही तर दोन दिवसात तो कोल्हा आपल्या घरात शिरेल आणि तिचे पावित्र्य उध्वस्त करेल. बरे याबद्दल ती आपल्या दुबई स्थित असणाऱ्या नवऱ्याला सांगावी तर तो दुबई वरून इकडे भारतात लगेच येऊ शकणार नव्हता. शिवाय तिचा नवरा तापट स्वभावाचा असल्याने तो रुचितालाच दोष देऊ लागेल असे तिला वाटू लागले. त्यामुळे आपल्या नवऱ्याचा ऑप्शन तिने बाजूला केला. श्यामलीला याबाबत सांगावे तर श्यामलीचे दहावीचे वर्ष होते. आधीच ती टेन्शनमध्ये होती आणि आता ही गोष्ट सांगितली तर तिचा धीर अधिकच चेपावून जाईल. म्हणून श्यामलीला सुद्धा ती सांगण्यास इच्छित नव्हती. आता तिच्यासमोर सर्व मार्ग बंद होत होते. तिला काहीच सुचत नव्हते की या चक्रव्युहात आपण कसे बाहेर पडायचे. कोण कृष्ण येईल की या द्रोपदीला वस्त्रहरणापासून दूर करेल. तिला काहीच याबाबत कळत नव्हते. हा हा म्हणता दोन दिवस निघून गेले. शुक्रवार उजाडला. इकडे रोहित तर शुक्रवारची आतुरतेने वाट बघत होता.

शुक्रवारी रात्री रुचिता खूपच घाबरली होती. श्यामलीच्या प्रश्नांकडे रुचिताचा लक्षही नव्हता. तेव्हा श्यामली बोलली की आई तू ठीक आहेस ना. गेले दोन दिवस तू फक्त चूप आहेस. नक्की काय झाले. त्या रोहित सरांनी तुला काय सांगितले. त्यावर रुचिता म्हणाली  त्याचा आणि याचा काहीच संबंध नाही. तू लवकर जेव आणि झोप आणि पाहिजे तर सकाळी लवकर उठून अभ्यास कर. याआधी श्यामलीला रुचिता असे कधीच बोलली नव्हती. पण श्यामली ने त्याकडे दुर्लक्ष केले आणि निमुटपणे आपले जेवण आठ वाजता केले आणि आपल्या बेडरूम मध्ये निघून गेली. अकरा वाजता रुचिताने श्यामलीचा बेडरूम डोअर उघडून चेक केले की ती झोपली का. त्यावर तिला दिसून आले की श्यामली आपल्या बेडरूम मध्ये गाढ झोपली होती. दिवसभर खूप दमली असल्यामुळे ती आता गाढ झोपली होती. एका अर्थी बरोबर झाले की चूक झाले हे परमेश्वरास ठाऊक.

आई काय करतेWhere stories live. Discover now