नुसरत भाग :- १९

659 0 0
                                    






नुसरत .....



अरे विक्की बाळा उठ की ! वेळ बघ किती झाली आहे . आई मला झोपेतून उठवत म्हणाली , अरे तुझी प्रतीक्षा ताई येणार आहे ना आज आणि तुला तिला स्टेशन वर घेण्याकरिता सुध्दा जायचे आहे . आई मला असे सांगून निघून गेली , थोडा वेळ तर मी काही उठलो नाही मात्र अचानक नुसरत ची आठवण झाली आणि मी लगेच बेड वरून उठून माझा फोन हातात घेऊन बघितला . सकाळचे नऊ वाजत आले होते . आज गुरवार होता त्यामुळे रेहान शाळेत गेला असेल . मी लगेच नुसरत हिला कॉल केला . पहिली बेल गेली , दुसरी आणि तिसरी सुध्दा तरी पण नुसरत ने फोन रिसिव्ह केला नाही . मी मनात पुटपुटले की बहुतेक माझे बाळ नक्कीचं काही तरी कामात असेल . मोबाईल मध्ये नोटिफिकेश बघितल्या की कुणाचा वाढदिवस दिवस आहे का आज ???
तर कुणाचा नव्हता मी मोबाईल बाजूला ठेवला आणि फ्रेश व्हायला गेलो .

साधारण वीस एक मिनिटात मी बाहेर आलो . मोबाईल बघितला तर नुसरत हिचे दोन मॅसेज येऊन होते .

गुड मॉर्निंग मेजर , थोडे कामात होते म्हणून कॉल घेतला नाही . सकाळी उठल्यावर तुझे मॅसेज बघितले . थोडे उशिरा घरी पोहचला काल . बरं तर आपण दुपारी बारा नंतर आरामात बोलुयात .
आई मिस यू मेजर ❣️

तिचा मॅसेज वाचल्यानंतर मी लगेच रिप्लाय म्हणून तिला हो आणि आई मिस यू टू , माझ्या बाळा . असा मॅसेज केला .

अरे आज मी तुझ्या करिता तुझ्या आवडीचे कांदे भजे केलें आहेत . मी बाहेर आलो तर आईने मला सांगितले . मला कांदे भजी खूप आवडतात . हो आणि मग त्या बरोबर गरमा गरम चहा असला की मग तर पार्टी समझा . अगं आई बाबा दिसत नाही आहेत ग आणि ही माझी लाडाची आजी कधी येणार काकांच्या घरून ???
मी भजी खात आईला विचारले , अरे तुझे बाबा ना हे काही कामानिमित्त बाहेर गेले आहेत तर तुझी आजी येईल एक किंवा दोन दिवसा मध्ये विक्की . आई मला चहा देत म्हणाली . अग आई ही प्रतीक्षा ताई कधी येणार आहे ग ??? मी एक घोट चहाचा घेत आई ला विचारले , अरे ती ना दुपारी बारा वाजता येईल म्हणत होती आणि हो बघ मी विसरले तुला सांगायचे विकी !!!
काय ग आई मी थोडे आश्चर्य चकित होत विचारले . अरे ते तुझे जोशी काका नाहीत का आज त्यांच्या मुलीचा वाढदिवस आहे आणि सोबत त्यांच्या नवीन घराचे वास्तू शांती सुध्दा ठेवली आहे , त्यामुळे आपल्या सह कुटुंब यांना आंत्रन दिले आहे त्यांनी बरं का .
आई ने मला एकाच वेळी सारे काही सांगून दिले . बरं आई मी तयार राहील . माझे आणि आईचे बोलणे सुरू होते तेवढ्यात मला योगेश पवार यांचा कॉल आला , विकी अरे थोडे बाहेर जाऊयात म्हटलें फिरायला . हो ना जाऊयात की अरे अगोदर ना आपल्याला ताईला बस स्टॉप वर आणायला जायचे आहे . बस थोडे आणखी बोलून मी फोन ठेऊन दिला . मी नाष्टा बहुतेक संपविला होता .
मी घड्याळ मध्ये बघितले तर अकरा वाजत आले होते .

ये आई येतो ग मी ताई ला घेऊन , असे म्हणून मी घरातून बाहेर पडलो .

धन्यवाद......

.

नुसरत Where stories live. Discover now