नुसरत
आत जावे की नाही हा एक मात्र विचार माझ्या मनात येत होता . कारण त्यांनी सामान्य लोकांना किंवा लहान मुलांना आपल्या बंदुकीच्या जोरावर तर ठेवले नसेल ना , राहुन राहुन हा विचार माझ्या मनात येत होता . शेवटी विचार केला आणि बेधडक आत गेलो , आम्ही असे अचानक आत येऊ. कदाचित त्या आतंवाद्यांना वाटले नसेल , त्यामुळे ते थोडे घाबरले . मात्र अश्याही ही वेळी त्यांनी आमच्यावर गोळीबार सुरू केला . प्रतिउत्तर म्हणून आम्ही सुध्दा गोळ्या झाडत होतो . आमची ही चकमक जेथे सुरू होती , तिथे आजूबाजूला कोणीही नव्हते . जवळजवळ दहा मिनिट आमचे हे सुरू होते .
एक गोळी अगदी माझ्या उजव्या काना जवळून गेली . मी लगेच खाली बसून बघितले तर हळुहळू रक्त वाहत होते .साहब आप पीछे हो जाओ , आगे हम होते है . माझ्या सोबत असलेल्या एका सैनिकांनी मला मागे खेचले . ते फक्त दोघे होते मात्र ते आमच्या पाच वर थोडे भारी पडत आहेत असे मला काही वेळा करिता वाटले . नाही त्याला कारण ही तसेच आहे , त्यांच्या जवळ असणारे हत्यारे हे खूप अडवांस होते . आता ते कुठून आले त्यांच्या जवळ हे आपल्या सर्वांना माहीत आहे .
मी मागे उभे राहून गोळी झाडात होतो . अचानक त्या पैकी एक थांबला आणि त्या एका सेकंदात आम्ही आमचा हल्ला खूप जोरात चढवला . जे व्हयाचे होते अगदी तेच झाले , पुढील काही मिनिटात आम्ही त्यांच्या मृत्य देहा जवळ उभे होतो . सबको बराबर चेक करो , देखो कुछ मिलता है या नहीं . असे म्हणून मी आत गेलो , तर तिथे अगोदर मेजर सुधीर पोहचलो होते . आम्ही डोळ्यांनी एकमेकांना जे सांगायचे ते सांगितले . नाही ती आमची एक विशिष्ठ भाषा असते , ते काहीं तुम्हाला नाही सांगू शकत . तेवढ्यात लोकल पोलीस सुध्दा शाळेच्या आत आले होते . त्यांच्या मदतीने आम्ही प्रत्येक लहान मुले आणि सोबत सर्वांना बाहेर काढू लागलो .
मला खूप जोरात सुसुसू लागली होती , म्हणजे ते लागून अर्धा तास तरी झाला असेल परंतु या मध्ये विसरून गेलो . मी मेजर यांना सांगून बाथरूम मध्ये आलो . मी आत गेलो आणि अचानक मला कोणी तरी लहान मुल रडत आहे असे वाटले . सुरवातीला भास झाला असेल म्हणून मी लक्ष नाही दिले , मात्र परत आवाज आला . मी लगेच बाथरूमच्या दाराजवळ जाऊन ते उघडून बघू लागलो . पहिला दरवाजा उघडला तर आत कोणी नव्हते . दुसरा उघडला तर दरवाजा आतून बंद होता . मी थोडी ताकद लाऊन उघडण्याचा प्रयत्न केला तर तो नाही उघडला . मुझे मत मारो , मी काही नाही केले . मला काही समजले नाही कारण एक तर हिंदी आणि सोबत मराठी भाषा . मी लगेच त्याला म्हणालो , बाळा भिऊ नकोस दरवाजा उघड . मी एक आर्मी ऑफिसर आहे . माझ्या मराठी मध्ये बोलण्याच्या परिणाम झाला का नाही हे सांगायला त्या मुलाला थोडा वेळ लागला . तुम्हाला मराठी कशी येते , ती पण इतकी छान . त्याने मला प्रश्न केला , आता त्याला काय उत्तर देऊ . तू अगोदर बाहेर ते , मग मी सांगतो . माझ्या या वाक्यावर तो मुलगा लगेच बाहेर आला .
तो बाहेर आला तर त्याच्या संपूर्ण शरीर खरचटले होते . काही ठिकाणी रक्त वाहत होते . मी त्याला आपल्या हातात घेत म्हणालो , नाव काय आहे तुझे बाळा . आपल्या गोड आवाजात तो म्हणाला रेहान . मी त्याला घेऊन बाहेर आलो , अगोदर त्याला थंड पाणी दिले . डॉक्टर आणि नर्स बाहेर आले होते . मी रेहान ला घेऊन त्यांच्या जवळ गेलो . त्यांनी रेहान ला ड्रेसिंग वैगरे केली . मधल्या काळात रेहान शांत होता .
रेहान काय झाले , मगा पासून शांत आहेस . मी त्याला एक चॉकलेट देत विचारले . आम्ही दोघेही आता थोडे बाजूला होतो आणि तिथे थोडी शांतता होती . नहीं वो आपको , इतनी अच्छी मराठी कैसे आती हैं . मी त्याच्या त्या प्रश्नावर परत हसलो , म्हणजे हा मगा पासून तोच विचार करत आहे . हे बघ मी , जेथे राहतो ना तिथे मराठी बोलत असतात आणि त्यामुळे मला ही भाषा येत . बरं तुला ही भाषा कशी काय येते ते सांग अगोदर मला , मी रेहान ला विचारले . उसका क्या है ना , हमारी मम्मी को आत है . तो उनका देख कर मै भी सीख गया , रेहान वयाच्या मानाने खूप जास्त समजदार होता . मला या गोष्टीचे खूप अभिमान वाटला . बरं चल मी तुला आता घरी सोडून देतो . मी एक जीप घेतली , जी बाजूला उभी होती आणि आम्ही निघालो .
धन्यवाद....