नुसरत भाग :- २३

538 3 0
                                    

बरं आता परत तू एकटी येणार आहेस की मला परत बोलावशिल घेण्या करिता , मी मुद्दाम टोमणा मारत ताईला म्हणालो . ओय बापू जास्त मोठा झाला का ??? प्रतीक्षा ताई काही बोलायच्या आत नूतन ताई अगोदरच मला म्हणाली . मी मात्र माझा चेहरा पाडला , अगदी गुपचूप तेथून काढता पाय घेतला . समजा मी ज़र का

तो भाई लोग बताओ , क्या क्या खाना है बावा तुमको . योगेश पवार आपल्या मुड (( येथे मुड या शब्दाचा काही दुसरा अर्थ लावू नये . )) ठरल्या प्रमाणे मी , आदित्य आणि योगेश बाहेर बिर्याणी खाण्या करिता आलो . संध्याकाळ झाली होती म्हणजे सूर्य दादा मावळला की समझुन जावे दिवस संपला . शाही बिर्याणी हे हॉटेल अगदी संपूर्ण शहरात प्रसिद्ध आहे , म्हणजे सांगायचे झाले तर फक्तं हैदराबादी बिर्याणी करिता खास करून . मग त्यात फिश करी , चिकन कबाब , चिकन सूप , चिकन कोरमा , चीली चिकन , रोस्टेड चिकन , चिकन तंदुरी हे तर मला माहित असलेले काही प्रकार आहेत . तुम्ही मेनू कार्ड हातात घेऊन बघाल तर काही शन तर डोकं काम करणे थांबून जाईल की ऑर्डर काय करायचे . आम्ही तिघे येथे बहुतेक तीन वर्षांपासून येत आहोत , त्यामुळे येथील मॅनेजर पासून तर वेटर काक सारेच आम्हाला ओळखतात .

तो बताओ बावा क्या मांगता तूमको , योगेश परत मला आणि आदित्य ला म्हणाला . मी तर आपले नेहमीचे एक फुल चिकन बिर्याणी घेणार आणि सोबत एक कोक . मी लगेच आपली ऑर्डर सांगून टाकली . मी आज काही नवीन खाण्याचा विचार करत आहो , आदित्य ने मेनू कार्ड मध्ये बघत बघत आम्हाला सांगितले . बरं तर मला फिश करी आणि सोबत तीन बटर नान , आदित्य ही मोकळा झाला आता आम्ही दोघे योगेश कडे बघू लागलो की हा आता काय ऑर्डर करतो ते तर . तो काका (( आमचे बोलणे सुरू असताना मध्येच वेटर काका आले होते . )) इन दोन के ऑर्डर आपने ऐकले अब माझा लिखो एक फुल चिकन हंडी आणि तीन तवा रोटी . काकांनी हसत आम्हाला आमची ऑर्डर परत सांगितली आणि पंधरा मिनिटे वेळ लागेल हे सुध्दा सांगून दिले .


तर मग आजची चर्चा सुरू होते ती काल हा योगेश पवार त्या मुली बरोबर का नाही बोलला ???
आदित्य ने सरळ विषय बदलला आणि सोबत योगेश याच्या चेहऱ्याचा रंग सुध्दा , मी मस्त पैकी हातवारे करून म्हणालो . जनाब अब असे आहे की , योगेश भाऊ लडकी की देख कर थोडा शरमा जाते है आणि सोबत त्यांची बोलती ही बंद होऊन जाते . माझ्या हा टोमणा बरोबर लागला आणि योगेश पवार याचा चेहरा खरंतर पाहण्या सारखा झाला . अरे भाऊँ वो कैसा है ना की अपन है , थोड़े ग़रीब आदमी बावा तो हो जाता है कभी कभी ग़लती से मिसटेक . आपले भाषण पूर्ण करुण भाऊँ मस्त पैकी बसले . मी एक वेळ  आदित्य कड़े बघितले  आनी त्याला शांत बसायाचा सल्ला दिला . खरंतर मला आणखी थोडा गेम घ्यायचा होता योगेश पवार चा पण मग विचार केला जाऊद्या राव हा माणूस काही पैसे देणार नाही आणि विनाकारण सारे बिल आपल्या मस्तकी बसेल , म्हणून बसलो गुपचूप .

जेवण मस्तपैकी झाले आणि थोडी आपली नेहमीची सवय असलेली वस्तू बाजूनेच असलेल्या पान ठेला (( पानपट्टी )) वरून घेतली . @@ काही personal असते हो नाही सांगत येत असे . @@

बरं भावा समझा ती मुलगी परत तुला दिसली तर तू तिच्या बरोबर बोलशील की नाही ते सांग मला अगोदर . आदित्य ने परत तोच विषय काढला . मी योगेश कडे बघितले तर तो खाली मान घालून विचार करत होता , जसे की जणू काही घोर तपश्चर्या करत असल्याचा भाव त्याचा चेहऱ्यावर मला जाणवला . आता का परत तुम्ही दोघांनी तो विषय परत काढला तर माझ्या इतका वाईट कुणी नाही , हे वाक्य तो आपल्या हातात खालचा एक दगड घेऊन आम्हाला म्हणाला .

धन्यवाद......


कथा कशी वाटली नक्की सांगा आणि ही कथा आता लवकर पूर्ण होईल याची खात्री देतो .

नुसरत Where stories live. Discover now