नुसरत.....
किती उशीर ताई ??? अग गेल्या एका तासा पासून आम्ही तुझी वाट बघत आहोत . मी प्रतीक्षा ताईची बॅग आपल्या हातात घेत म्हणालो . अरे विक्की समोर रस्त्याचे बांधकाम सुरू होते आणि वाटेत ट्रॅफिक सुध्दा खूप होते . त्यामुळे मला इतका उशीर झाला आणि त्यात भर म्हणून गाडीचे चाक पंक्चर झाले होते . ताई त्रस्त् होऊन मला सांगत होती . बरं कसे काय सुरू आहे तुझे , तबियत तर बरी आह ना . ताई आपल्या नेहमीच्या चेष्ठा करतं मला म्हणाली . हो ग सारे काही मजेत आहे , त्याचे काय आहे ना ; तुझी वहिनी खूप जास्त काळजी घेते ना माझी . मी हसत हसत ताईला म्हणालो . अरे बस बस आता वहिनी बद्दल सांगत आहेस म्हणजे कुणी शोधली की काय देवा !!!
ताई थोडी शंकेने माझ्या कडे बघत म्हणाली . मी लगेच आपल्यावर येत असलेले पारडे फिरविले आणि ताईला म्हणालो . अग कशाचे काय आणि कशाची वहिनी , तुला वाटतं का माझ्या कडे बघून मला कुणी मुलगी पसंत करेल . मी मस्त खालच्या स्वरात हे वाक्य म्हटले आणि माझा निशाणा अचूक लागला . अरे हो रे बाळा मला माहीत आहे की तुझे नशीब मुलींच्या बाबत किती बेकार आहे ते . ताई परत हसायला लागली . मधल्या काळात ताई नी योगेश आणि आदित्य बरोबर जुजबी बोलणे केले आणि आम्ही गाडी घेऊन घराकडे निघालो . आम्ही घराच्या जवळ पोहचलो आणि माझा फोन वाजला . मी मुद्दाम नुसरत नंबर करिता एक वेगळी म्हणजे थोडीशी रोमँटिक रिंग टोन ठेवली होती . आता तीच वाजली मला कळून चुकलं की नुसरत आता फ्री झाली असेल साऱ्या कामातून . मी फोन काही घेतला नाही आणि गाडीचा वेग थोडा वाढवला . लगेच ताईला गेट वर सोडून दिले आणि आपला मोबाईल बाहेर काढून नुसरत हिला एक मॅसेज करून दिला की अर्ध्या तासाने कॉल करतो . ताई आत गेली आणि मी बाहेर उभा राहिलो .
बरं मग आज मोकळा आहेस की आणखी काही कामे आहेत करायची ??? योगेश पवार ने आपल्या चिडक्या आवाजात मला विचारले . अहो नाही भाऊ आज काही कामे नाही आहेत , सांगा कुठे जायचे आज . मी हसून त्याला उत्तर दिले . तो फिर आज मोहमद अली रोड की बिरयानी मार कर आते की , मिया
आदित्य ने एक प्रस्ताव सुचविला . मी योगेश पवार काय म्हणतो या कडे बघू लागलो . अरे भावा नक्कीच , तसेही खूप दिवस झाले आहेत ना आपण सोबत बिर्याणी खाण्या करिता गेलो नाही ते ; योगेश आमच्या कडे बघून म्हणाला . बरं मग आता निघायचे की अर्ध्या तासाने , आता मी माझा निर्णय सांगितला . आदित्य ने लगेच अर्ध्या तासाने जाऊयात म्हटले . त्यावर आम्ही तिघांनी सहमती दर्शविली . त्यानंतर लगेच गाडीला सेल्फ मारून हे दोघे निघून गेले . मी घरात जाऊ लागलो तर मला शिरसाट काका दिसले .